मग सर्वप्रथम हे समजून घ्या..
खुलेपणाने मांडा तुमची मते
विद्यार्थ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी लोकसत्ताने सुरू केलेल्या ब्लॉग बेंचर्स या स्पध्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
स्पध्रेची संपूर्ण स्वरूप आणि सहभागी होताना काय करायचे याचा तपशील संकेतस्थळारील ‘एफएक्यू’मध्ये देण्यात आले आहेत. तरीही काही विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठीचा हा तपशील.
indianexpress-loksatta.go-vip.net /blogbenchers  या संकेतस्थळावर FAQ या शीर्षकाखाली स्पर्धेविषयीच्या विद्यार्थ्यांच्या मनातील सर्व प्रश्नांचे शंका निरसन करण्यात आलेले आहे. तरी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होताना सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे जरूर वाचावीत.
ल्ल लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स या संकेतस्थळावर दर आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध केला जाईल.
ल्ल लेखावर प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी लेखाच्या शेवटी असलेल्या ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली असलेल्या ‘तुमची प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी येथे लॉग इन करा.’ या शीर्षकावर क्लिक करून तुमचे लॉग इन करून तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता.
ल्ल सदर लेखावर विद्यार्थी शुक्रवार ते गुरुवार म्हणजेच पुढील सात दिवस आपल्या सवडीप्रमाणे ५००-७०० शब्दांत लेखावरील किंवा त्या विषयावरील त्यांची प्रतिक्रिया (ब्लॉग) नोंदवू शकतात.
ल्ल प्रत्येक विद्यार्थ्यांला दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखावर फक्त एकदाच प्रतिक्रिया देता येईल.
ल्ल लेखावरील प्रतिक्रियाच केवळ स्पर्धेसाठी ग्राह्य़ धरल्या जातील. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या किंवा अवांतर विषयावर लिहिलेल्या प्रतिक्रिया स्पर्धेसाठी ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत.
ल्ल ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना अपूर्ण माहिती भरली आहे, ते विद्यार्थी संकेतस्थळावर त्यांचा युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून इतर माहिती भरू शकतात तसेच स्वत:चा फोटो आणि महाविद्यालयाचे ओळखपत्रही अपडेट करू शकतात.
‘विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन समृद्धीमध्ये भर टाकणारा उपक्रम’
आजच्या तरुणाईला ‘वॉटसअ‍ॅप’आणि ‘फेसबुक’ यांनी वेढलेले असताना ‘ब्लॉगबेंचर्स’सारखे उपक्रम हे नक्कीच सकारात्मक ठरू शकतील. ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे ‘लिहाल तर यशस्वी व्हाल’ याकडे तरुणाईची वाटचाल सुरू होईल. आजच्या डिजिटल युगात ब्लॉगवाचन आणि लेखन ही आधुनिक पद्धत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन समृद्धीमध्ये नक्कीच भर टाकेल. इतरही ब्लॉग वाचण्याची त्यांना आपोआप आवड आणि सवय लागेल. तरुणाईची ऊर्जाही एका चांगल्या उपक्रमासाठी वापरता येईल. या डिजिटल वाचनसंस्कृतीचा उपयोग विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन, विद्यापीठीय आणि राष्ट्रीय स्तरांवर आयोजित करण्यात येणाऱ्या वक्तृत्व, निबंध आणि वाद-विवाद यांसारख्या स्पर्धेमध्ये यशस्वीपणे उतरण्यासाठीही खूप मोठा फायदा होईल. एकूणच वाचन आणि लेखन हे आपले अनुभवविश्व प्रगल्भ करीत असतात. विद्यार्थीदशेतच नाही तर पुढील आयुष्यासाठीच ते अतिशय उपकारक ठरते. या निमित्ताने संदर्भग्रंथ, साहित्याचे वाचन आपोआपच मुलांमध्ये भिनेल. शैक्षणिक, सामाजिक भान या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृिद्धगत होईल यात शंका नाही.

Untitled-10
-डॉ. मनाली लोंढे, संचालक, विद्यार्थीकल्याण विभाग, मुंबई विद्यापीठ

लॉग इन करताना तांत्रिक अडचणी येत आहेत त्यांनी prashant.nanaware @expressindia.com या ईमेलवर संपर्क साधावा.