कोणत्याही एकाधिकारीशाही राजवटीस ज्याप्रमाणे हे सर्व जनतेस समजावून देण्याची गरज वाटत नाही. त्याप्रमाणे मोदी सरकारलाही त्यांच्या महत्त्वाच्या निर्णयांची सांगोपांग चर्चा व्हावी असे वाटत नाही. हे सरकार केवळ ‘मिनिमम गव्हर्मेट, मॅक्झिमम गर्व्हनन्स’ आदी दिलखेचक घोषणा करणार आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवावा असा आग्रह धरणार. राजकीय पक्षांचे देणगी व्यवहार आणि संसदेने वित्तविधेयकास दिलेली मान्यत या मुद्दय़ांच्या पाश्र्वभूमीवर वरील मुद्दय़ांच्या अंगाने चर्चा ‘ऑर्वेलचा आनंद’ या अग्रलेखात करण्यात आली आहे.

पारदर्शक म्हणावयाचे आणि कारभार जास्तीत जास्त अपारदर्शक ठेवायचा, सहिष्णूतेची भाषा करायची पण वर्तन कमालीचे असहिष्णू करायचे. जॉर्ज ऑर्वेल या कादंबरीकाराच्या ‘१९८४’ या कादंबरीत असे उत्तम नमुने आढळतात. मोदी सरकारचा सध्याचा कारभार देखील असाच असून सरकारच्या या कार्यशैलीने ऑर्वेलच्या यांच्या कांदबरीचा आनंदयोग पुन्हा घडवून आणल्याचे उपहासात्मकरित्या या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

‘ब्लॉगबेंचर्स’ या स्पर्धेसाठी या वेळी ‘ऑर्वेलचा आनंद’ हा अग्रलेख देण्यात आला आहे. आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.

विजेत्यांना पत्रकारितेची संधी

‘लोकसत्ता’मधील विविध अग्रलेखांवर उत्तम रीतीने मतप्रदर्शन करून ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांमधील सजगतेला व लेखनगुणांना अधिक वाव मिळावा यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे त्यांना ‘प्रशिक्षणार्थी पत्रकार’ म्हणून संधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थी पत्रकार पदासाठी पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा. अर्जामध्ये नाव, वय, सध्या सुरू असलेले शिक्षण, पत्ता, महाविद्यालय आदी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुरस्कारप्राप्त लेखाचा विषय नमूद करावा. अर्ज loksatta@expressindia.com  या मेल आयडीवर पाठवावा.