– योगेश मेहेंदळे
मोरूच्या मावशीला अजरामर करणाऱ्या विजय चव्हाणांच्या निधनानंतर अपेक्षित असा शोक सर्व स्तरांवर व्यक्त झाला. परंतु त्याचवेळी अनपेक्षित अशी चिखलफेकही झाली, जी दुर्दैवीच म्हटली पाहिजे. अर्थात, सध्याच्या सोशल मीडियामधलं ट्रोलिंग नी अत्यंत हीन भाषेत होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांचा विचार केला तर सचिन कुंडलकर, आदेश बांदेकर व जितेंद्र जोशींनी फारच संयत भाषेत व संयम बाळगून आपलं म्हणणं मांडलंय. सुदैवानं या सगळ्यांनी वादाची पातळी अद्याप तरी खालच्या स्तरावर जाऊ दिलेली नाही, हे नक्कीच स्वागतार्ह आहे.
समजा, आज जर विजय चव्हाणांना किंवा या कलाकारांच्या भाषेत विजूमामांना या सगळ्या प्रकरणावर काही बोलावसं वाटलं असतं तर ते काय म्हणाले असते.. कदाचित त्यांनी या सगळ्याकडे मिश्किलपणे पाहिलं असतं आणि ते म्हणाले असते…
टांग टिंग टिंगा ग टांग टिंग टिंगा ग…
टांग टिंग टिंगा ग टिंग..
सचिनच्या मेंदूत शिरला बाई भुंगा
टांग टिंग टिंगा ग टांग टिंग टिंगा ग…
टांग टिंग टिंगा ग टिंग…
श्रावणाच्या थाळीला कोकणचो झिंगा,
मामाच्या भेटीला भाचरांचा ठेंगा,
मावशीच्या अंगावर फोर्टिसचा लेंगा,
मोरूची मावशी, घाली यमाशी पिंगा
पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा…
First Published on August 25, 2018 4:31 pm