जय पाटील

गँग्ज ऑफ वासेपूर, मसान, इनसाइड एजमुळे सर्वपरिचित असलेली रिचा चढ्ढा आता एक अगदी वेगळे पात्र साकारताना दिसणार आहे. अडल्ट स्टार म्हणून ओळखल्या गेलेल्या शकीला वरच्या चरित्रपटात रिचा प्रमुख भूमिका साकारणार आहे. प्रत्यक्षात हा चित्रपट २०२०च्या आरंभीच प्रदर्शित होणार होता, मात्र करोना विषाणूच्या साथीमुळे चित्रपटगृह बंद ठेवण्यात आल्याने त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. आता येत्या नाताळमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

महिलांच्या आयुष्याला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या चित्रपटांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कधी त्यात सर्वसामान्य महिलेची असामान्य कहाणी येते, तर कधी जगप्रसिद्ध महिलांचा पडद्याआड राहिलेला संघर्ष दिसतो. अशा चित्रपटांच्या मालिकेत शकीलाच्या निमित्ताने आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून त्यात रिचा साडी गजरा आणि गुलाबी काचांचे गॉगल्स लावून हातात पिस्तुल घेऊन उभी दिसते. पार्श्वभूमीवर ‘बॉक्स ऑफिस क्वीन’ अशी अक्षरे असलेले पोस्टर आणि शकीलाच्या वर्ण-बांध्या विषयी केली जाणारी काही आक्षेपार्ह वक्तव्ये आहेत.

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पत्रकार आणि चित्रपटनिर्माते इंद्रजीत लंकेश यांनी केले आहे. स्टारडम पलीकडच्या शकीलाच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे आणि ते प्रेक्षकांसमोर मांडणे हा या चित्रपटामागचा मुख्य हेतू आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे उदयोन्मुख कलाकारांचा चित्रपटविश्वाबद्दलचा दृष्टिकोन अधिक व्यापक होईल, या क्षेत्राच्या झगमगाटापलिकडचे वास्तव जाणून घेण्यासाठी त्यांना मदत होईल, असे मत लंकेश यांनी मांडले आहे.

‘मी शकीला यांना २००३ पासून ओळखतो. त्यांच्या जीवनप्रवासाने माझे लक्ष वेधून घेतले. मी त्यांच्या काही प्रदीर्घ मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या स्टारडमपलिकडेही बरेच काही जाणून घेण्यासारखे, लोकांसमोर मांडण्यासारखे आहे, हे माझ्या लक्षात आले. त्यांचे व्यक्तिमत्त्व रिचा चढ्ढाच उत्तमरित्या साकारू शकते याविषयी मला शंकाच नाही,’ असे इंद्रजीत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि राजीव पिल्लाई महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.