प्रत्येक माणसाच्या दोन भुका असतात. एक असते पोटाची भूक एक असते लैंगिक भूक. लैंगिकता हा माणसाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. लग्नसंस्था हीदेखील याच तत्त्वावर उभी आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजेच नवरा-बायकोसारखं एकमेकांबरोबर राहणं यात अर्थात शरीरसंबंधही आलेच. लिव्ह इन हा प्रकार आपल्याकडे येऊनही बरेच दिवस झाले. आता शुगर डॅडी आणि शुगर मम्मी हे दोन प्रकार उच्चभ्रूंमध्ये सर्रास चालतात असं समोर आलं आहे. गुप्तहेर प्रिया काकडे यांनी नुकतीच ‘मित्र म्हणे’ या सौमित्र पोटेंच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी शुगर डॅडी आणि शुगर मम्मी हे नेमकं काय आहे? ते समजावून सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुगर डॅडी आणि शुगर मम्मी म्हणजे काय?

‘शुगर डॅडी’ आणि शुगर मम्मी असे दोन प्रकार अस्तित्वात आहेत. ‘शुगर डॅडी’ असणारा माणूस किंवा ‘शुगर मम्मी’ होणारी बाई हे प्रचंड श्रीमंत असतात. त्यांच्याकडे अफाट संपत्ती, पैसा असतो. शुगर मम्मी होणं म्हणजे साधारण ५५ ते ६० किंवा त्यापुढचं वय झालेल्या बाईने तिच्या शारिरीक गरजेसाठी तिच्यापेक्षा कमी वयाचा मुलगा, पुरुष शोधणं. ‘शुगर डॅडी’ होणं म्हणजे ६० किंवा त्याहून अधिक वय झालेल्या माणसाने त्याच्या शारिरीक गरजा भागवण्यासाठी कमी वयाची मुलगी किंवा महिला शोधणं. ज्या मुलीचा शुगर डॅडी असेल ती मुलगी त्याच्या शारिरीक गरजा भागवते, त्याच्याशी शरीर संबंध ठेवते. ज्या मुलाची शुगर मम्मी असेल तो तिच्या शारिरीक गरजा भागवतो, शरीर संबंध ठेवतो. उच्चभ्रू वर्गात गेल्या दहा वर्षांपासून हा ट्रेंड रुजला आहे.

शुगर मम्मी कोण होतं?

ज्या अतिश्रीमंत महिलांचा घटस्फोट झालाय, नवरा बाहेरच्या देशात आहे, ज्या विधवा झाल्या आहेत अशा महिला शुगर मम्मी होतात. क्लबमध्ये जायचं तिथे कॉलेजमधल्या मुलांना हेरायचं तिथे त्यांना कुठल्या तरी बहाण्याने जवळ बोलवलं जातं. या स्त्रियांना कमी वयाच्या मुलांकडून शारिरीक गरज भागवून घेतली जाते. २२ ते ३० या वयोगटातल्या मुलांना किंवा पुरुषांना या बायका हेरतात. डेटिंग अॅपवरुनही काहींची ओळख होते. Ready to This वगैरे मेसेज करुन मुलं जाहिरातीही करतात. तेव्हा शुगर मम्मी व्हायचं आहे अशा बायका त्या मुलांसह डेटला जातात, त्यांना महागड्या भेटवस्तू देतात. आयफोन देतात, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातात. दारु, सिगारेट, ड्रग्ज या गरजा भागवतात. तसंच पैसे लागले तर पैसेही या स्त्रिया त्या मुलांना पुरवतात. त्या बदल्यात शरीर संबंध प्रस्थापित करायचे इतकीच शुगर मम्मीची त्या मुलाकडून अपेक्षा असते. त्यामुळे मुलांना हे आवडतं. तसंच मुलगा आपल्यापेक्षा कमी वयाचा आहे याचा त्या स्त्रियांना काही फरक पडत नाही. अनेकदा या स्त्रिया लग्न झालेल्या पुरुषांशीही अफेअर करतात, म्हणजे भावनिक नातं त्या दोघांमध्ये निर्माण होऊ नये. शरीर संबंधांपुरतं आणि महागड्या गिफ्टपुरताच तो व्यवहार रहावा याची ती काळजी घेतलेली असते.

शुगर डॅडी संकल्पना काय आहे?

शुगर डॅडी ही संकल्पनाही बऱ्यापैकी अशीच आहे. ५५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे श्रीमंत आणि उच्चभ्रू पुरुष असतात. त्यांच्याकडे बंगला, गाडी, विमानप्रवास करण्याची ऐपत हे सगळं असतं. एखाद्याच्या बंगल्यात मुली पेईंग गेस्ट म्हणून राहात असतील आणि तो माणूस एकटाच आहे हे त्यांच्या लक्षात आलं की त्याच्या गळ्यात पडणं, त्या पुरुषाशी संबंध ठेवणं, त्याच्याशी अफेअर करणं. त्या बदल्यात भेटवस्तू देणं, पैसे देणं, प्रॉपर्टी खरेदी करुन देणं अशा गोष्टी घडतात. अनेकदा हे शुगर डॅडींचं आकर्षण मुलींनाही होतंच कारण मुलींना गोव्याला विमानाने नेलं जातं, बाहेरच्या देशात विमानाने नेलं जातं. छानछोकीसाठी सगळा खर्च केला जातो, महागडी गिफ्ट दिली जातात. त्यामुळे असे शुगर डॅडी अनेकदा मुलींनाही हवेसे असतात. त्या बदल्यात त्या माणसाशी मुली शरीर संबंध ठेवतात. त्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. सगळ्या गरजा भागत असतात, छोट्या खेड्यातून मुलगी आली असेल तर त्यांना हे सगळं स्वातंत्र्यच वाटतं. शुगर डॅडी, शुगर मॉमचा ट्रेंड हा खूप वाढला आहे. असंही प्रिया काकडे यांनी सांगितलं.

शुगर डॅडी किंवा शुगर मम्मीचा ट्रेंड मुंबई, पुण्यात बऱ्यापैकी वाढला आहे. तरीही जो पुरुष शुगर डॅडी आहे त्याची बायको असेल किंवा जी स्त्री शुगर मॉम आहे तिचा नवरा असेल तर त्यांना या सगळ्या गोष्टींबाबत आक्षेप असतात. त्यावेळी अशा व्यक्ती या गुप्तहेरांकडे धाव घेतात असंही काकडे यांनी मुलाखतीत सांगितलं. भारतातल्या मेट्रो सिटीजमध्ये हा ट्रेंड वाढला आहे. सध्या बरेच लोक सगळी कायदेशीर प्रक्रिया करुन अशा प्रकारचं नातं निवडतात असंही काकडे यांनी सांगितलं. जगभरात केनिया हा असा देश आहे जिथे शुगर डॅडी, शुगर मम्मी हे प्रकार चालतात. साधारण महाविद्यालयात जाणारे २० टक्के मुलं मुली हे शुगर डॅडी किंवा शुगर मम्मी शोधतात आणि डेटिंग, अफेअर्स करतात.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is sugar daddy and what is sugar mummy why do elites do this scj
First published on: 24-01-2024 at 18:33 IST