मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे डबेवाले १७ फेब्रुवारीला मतदानाबद्दल जागृती निर्माण व्हावी, यासाठी दिंडी काढणार आहेत. चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेरील प्रदर्शन मंडपापासून सायंकाळी ६ वाजता ही दिंडी निघणार आहे. चर्चगेट-हुतात्मा चौक-महापालिका मुख्यालय(सीएसटी)-हुतात्मा चौक-रिगल सिनेमा-मंत्रालय-नरिमन पॉईंट-चर्चगेट असा दिंडीचा मार्ग असणार आहे.

१८ फेब्रुवारीलादेखील अंधेरीतील सात बंगला येथून दिंडी काढण्यात येणार असल्याची माहिती माहिती मुंबई महापालिकेने दिली. या दिंडीत जवळपास ५०० डब्बेवाले व पारंपरिक वेशात वासुदेव सहभागी होणार आहेत. ऑगस्ट २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या मतदार जनजागृतीबद्दलच्या खुल्या चित्रकला, घोषवाक्य स्पर्धेतील निवडक चित्रे व घोषवाक्यांचे प्रदर्शन १८ आणि १९ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळील भाटिया उद्यानाशेजारील व चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर (फलाट क्रमांक ४) मोकळ्या जागेत भरवण्यात येणार आहे. मुंबईचे डबेवाले मतदार जागृती दिंडी चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेरील प्रदर्शन मंडपापासून सायंकाळी ६ वाजता निघणार आहे.