आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली असून बुधवारी रात्री तब्बल १५० उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याचे समजते. या पहिल्या यादीत वाद नसलेल्या जागांचा समावेश आहे. मात्र, शिवसेनेकडून अद्यापपर्यंत ही यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. ३ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. कालपर्यंत मुंबईत फक्त १६६ उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आज आणि उद्याचा असे दोनच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांची लगबग सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेकडून पहिल्या यादीत अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर, शीतल म्हात्रे, दीपा पाटील , मनसेतून सेनेत प्रवेश केलेले चेतन कदम यांची पत्नी भारती कदम , किशोरी पेडणेकर , देवेंद्र आंबेरकर, तृष्णा विश्वासराव, विशाखा राऊत यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी स्वपक्षीय नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर  या नगरसेविकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाद मागितली होती. या प्रकरणाची पक्षप्रमुखांनी गंभीर दाखल घेऊन  घोसाळकर यांच्या हकालपट्टीची आदेश  दिल्याची चर्चा होती. त्यामुळे वॉर्ड क्र. १ आणि वॉर्ड क्र. ८ मधून कोणाला उमेदवारी मिळणार, याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र, उमेदवारी यादीतील माहितीनुसार वॉर्ड क्र. १ मधून अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर तर वॉर्ड क्र. ८ मधून दीपा पाटील यांना उमेदवारी मिळाल्याचे निश्चित झाले आहे.

शिवसेनेकडून एबी फॉर्म देण्यात आलेले उमेदवार

प्रभाग क्रमांक 1 : तेजस्विनी घोसाळकर
प्रभाग क्रमांक 2 :- भालचंद्र म्हात्रे
प्रभाग क्रमांक 3 :- बालकृष्ण बिद्र
प्रभाग क्रमांक 4 :- सुजाता पाटेकर
प्रभाग क्रमांक 5 :- संजय घाडी
प्रभाग क्रमांक 6 ;- हर्षल कारकर
प्रभाग क्रमांक 7 :- शीतल म्हात्रे
प्रभाग क्रमांक 9 :- सचिन म्हात्रे
प्रभाग क्रमांक 10 :- मिलिंद म्हात्रे
प्रभाग क्रमांक 11 :- रिद्धी खूरसुंगे
प्रभाग क्रमांक 13 :- राजा कदम
प्रभाग क्रमांक 14 :- भरती कदम
प्रभाग क्रमांक 15 :- परेश रोणी
प्रभाग क्रमांक 16 :- प्रति दांडेकर
प्रभाग क्रमांक 17 :- डॉ. शिल्पा सौरभ संगोरे
प्रभाग क्रमांक 18 :- संध्या दोशी
प्रभाग क्रमांक 25 :- माधुरी भोईर
प्रभाग क्रमांक 26 :- भारती पदगली
प्रभाग क्रमांक 182: मिलिंद वैद्य
प्रभाग क्रमांक 192 : प्रीती पाटणकर
क्रमांक- १९१- विशाखा राऊत
क्रमांक- १९४- समाधान सरवणकर
क्रमांक- १७९- तृष्णा विश्वासराव
क्रमांक- १७५- मंगेश सातमकर
क्रमांक- १९६- आशिष चेंबूरकर
क्रमांक- १९३- हेमांगी वरळीकर
क्रमांक- १९९- किशोरी पेडणेकर
क्रमांक- १९५- स्नेहल आंबेकर
क्रमांक- २०३- इंदू मसूलकर
२१६- अरुंधती दुधवडकर
२२२- मीनाताई कांबळी