आज जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं शेअर बाजाराने स्वागत केलं. आज अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १ टक्क्याने वाढ झाली होती.
आज सकाळी अर्थसंकल्प मांडण्यासाठी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी भाषणाला सुरूवात केली तेव्हापासून शेअर बाजारात तेजी यायला सुरूवात झाली होती. अर्थसंकल्प मांडून आपलं भाषण संपवून जेटली जेव्हा खाली बसले तेव्हा मुंबई स,्टाॅक एक्सचेंजच्या सेन्सेक्समध्ये ३०० तर नॅशनल स्टाॅक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये ८० अंकांची सुधारणा झाली.
ट्रेडिंग संपलं तेव्हा सेन्सेक्सने ४०१ अंकांची उसळी घेत २८,००० चा आकडा पुन्हा गाठला. तर निफ्टीने ८६४० टा पल्ला गाठला
आजच्या अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्र्यांनी सरकारी बँकिंग क्षेत्रासाठी १० हजार कोटींचा भांडवली पुरवठा जाहीर केल्याने बँकांच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये चांगलीच वाढ झाली. सार्वजनिक क्षेत्रांतल्या स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, बँक आॅफ बरोडा या बँकांच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. खाजगी बँकांमध्ये आयसीआयसीआय बँकच्या शेअर्सची कामगिरी चांगली राहिली तर एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सुरूवातीला घट झाली होती.
आजच्या दिवशी शेअर बाजारात झालेल्या सुधारणेच्या आधी गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजारात २२६ अंकाची घसरण झाली होती.
पायाभूत सोयीसुविधांच्या सुधारणांसाठी ३.९६ लाख कोटी रूपयांची तरतूद केल्यामुळे याही क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुधारणा झाली.
याशिवाय गृह, वाहनं आणि एफएमसीजी क्षेत्रांमधल्या कंपन्यांचे शेअर्सही वधारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या अर्थसंकल्पाचा बँकांच्या व्याजदरावर लगेच परिणाम होणं सोपं नसलं तरी बाजारात वित्तपुरवठा वाढण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचा परिणाम होत पुढच्या काळात कर्जांवरचा व्याजदर कमी होईल अशी आशा करायला करायला हरकत नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Markets rise after the budget highlights of union budget 2017
First published on: 01-02-2017 at 18:06 IST