अर्थसंकल्पातून मला काय?

उज्ज्वला योजनेतून मोफत एलपीजी जोडणीमध्ये ८ कोटींपर्यंत विस्तार

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

महिला

 • उज्ज्वला योजनेतून मोफत एलपीजी जोडणीमध्ये ८ कोटींपर्यंत विस्तार
 • नोकरदार महिलांना पहिल्या तीन वर्षांसाठी कर्मचारी भविष्य निधीतील स्व-योगदानात १२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत घट
 • महिला बचतगटांना कर्जपुरवठय़ात ३७ टक्क्यांपर्यंत वाढीचे लक्ष्य
 • मुद्रा योजनेत ७६ टक्क्यांहून अधिक खाती महिलांची असून, योजनेसाठी कर्जपुरवठय़ाचे लक्ष्य वाढून ३ लाख कोटींवर

 

पगारदार

 • उत्पन्नातून ४०,००० रुपयांच्या प्रमाणित वजावटीला पुन्हा सुरुवात
 • प्राप्तिकराच्या रचनेत कोणत्याही सुधारणा नसल्याने करवाढ नाही, पण दिलासाही नाही
 • एकूण करांवर ४ टक्के शैक्षणिक + आरोग्य उपकराची (अतिरिक्त १ टक्का) मात्रा
 • केवळ ‘ईज ऑफ लिव्हिंग’ म्हणजे भविष्यात चांगल्या जीवनमानाच्या स्वप्नाचे कोरडे आश्वासन

 

ज्येष्ठ नागरिक

 • बँका-पोस्टातील ठेवींवरील करमुक्त व्याज उत्पन्नाची मर्यादा सध्याच्या वार्षिक १० हजारांवरून ५० हजारांवर
 • वैद्यकीय खर्च, मेडिक्लेम हप्त्यासाठी खर्चातून करवजावटीची मर्यादा सध्याच्या ३० हजारांवरून ५० हजारांवर
 • वार्षिक ८ टक्के निश्चित व्याज लाभ देणाऱ्या पंतप्रधान वय वंदना योजनेत कमाल गुंतवणुकीची मर्यादा सध्याच्या ७.५ लाखांवरून १५ लाखांवर
 • पेन्शनधारकांसाठी ४०,००० रुपयांच्या प्रमाणित वजावटीचा पुन्हा प्राप्तिकरात समावेश करण्यात आला आहे.

 

लघुउद्योजक/कारागीर

 • सवलतीच्या २५ टक्के कंपनी कराच्या पात्रतेसाठी वार्षिक उलाढालीच्या मर्यादेचा ५० कोटींवरून २५० कोटी रुपयांपर्यंत विस्तार
 • सवलतीत कर्जपुरवठय़ासाठी ३,७९४ कोटी रुपयांची तरतूद
 • कर्ज थकीताच्या समस्येवर प्रभावी तोडग्यासाठी उपाययोजना लवकरच

 

शेतकरी

 • खरिपाच्या पिकासाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव प्रस्तावित
 • देशभरात २२,००० ग्रामीण कृषी बाजारपेठातून थेट पणन सुविधा; २००० कोटींची तरतूद
 • बाजारापर्यंत वाहतूक सुलभतेकरिता सडक सुधारणांवर भर
 • प्रत्येकी १००० हेक्टरची समूह शेती विकासाची (क्लस्टर्स) केंद्रांची योजना
 • बटाटा, टोमॅटो, कांदे अशा नाशिवंत जिनसांच्या भावातील चढ-उतारांच्या समस्येवर ‘ऑपरेशन ग्रीन’मधून ५०० कोटींची तरतूद

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Union budget highlight 2018 reviews part