अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना शेअर मार्केटमध्ये आज सकाळी सकारात्मक चित्र पहायला मिळाले. मात्र अर्थसंकल्प सादर करुन झाल्यानंतर शेअर मार्केटच्या सेन्सेक्समध्ये तब्बल १००० हजार अंकाची विक्रमी उसळी पाहायला मिळाली. बीएसई आणि एनएसई या दोन्ही स्टॉक मार्केटमधील अनेक कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात आलेले पाहायला मिळाले. नोकरदारांना दिलेली कर सवलत, विविध क्षेत्रांना दिलेली भरीव तरतूद यामुळे शेअर मार्केटमध्ये नवचैतन्याचे वातावरण दिसले.

हे वाचा >> Budget 2023 : सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वाची घोषणा

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये

केंद्रीय अर्थसंकल्पाचे शेअर बाजाराने स्वागत केल्याचे दिसून येत आहे. आज दुपारी १ वाजता सेन्सेक्समध्ये १००० हजार अंकाची वाढ होऊन सेन्सेक्स ६०,५५० पर्यंत पोहोचला होता. तर निफ्टीत जवळपास २२५ अंकाची वाढ होऊन १७,९०० च्या पुढे निफ्टी पोहोचला होता. सर्वात जास्त वाढ ग्राहक उत्पादने, बँक, मेटल उद्योग या क्षेत्रामध्ये दिसून आली. याच्या व्यतिरिक्त बांधकाम क्षेत्राचे समभाग, कन्झ्यूमर ड्युरेबलल, ऑटो आणि टेक इंडेक्समध्येही मोठी तेजी पाहायला मिळाली. तर ऊर्जा, तेल आणि गॅस इंडेक्स जैसे थे पाहायला मिळाला.

हे ही वाचा >> Union Budget 2023-24 : सोने, चांदी, प्लॅटिनम महागणार, सिगारेटवरील कस्टम ड्युटीत वाढ

अदाणी समूहावर झालेल्या आरोपामुळे सोमवारपासून शेअर मार्केटमध्ये मरगळ आली होती. आज बुधवारी सकाळपासूनच बाजारात तेजी पाहायला मिळत होती. गेल्या काही दिवसांत ६० हजाराच्या खाली आलेला सेसेंक्स आज ६० हजारांच्या वर गेला. अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत यामध्ये १००० अंकाची वाढ झाली. मागच्या दहा वर्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पावेळी फक्त दोन वेळा सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये दोन टक्क्यांहून अधिकची वाढ पाहायला मिळालेली आहे. निर्मला सीतारमन यांनी भाषणाची सुरुवात करताच पहिल्या १० मिनिटांत ६०० अकांनी सेंसेक्सची उसळी पाहायला मिळाल. निफ्टी देखील एक टक्क्याने वाढला.