केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं अभिनंदन करत आभारही मानले आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या अंतरिम अर्थसंकल्पात विशेषत: महिला, शेतकरी, गरिब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे. एक कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा देऊन ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्प यात आहे. गरीब, चाळीत, झोपडपट्टीत राहणारे, मध्यमवर्गीय यांना स्वत:चे घर घेण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे. १ लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करुन युवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय तर अतिशय क्रांतीकारी आहे. यातून आमचे युवा हे मोठ्या प्रमाणात उद्यमी होतील. यातून संशोधनाला आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मोठी चालना मिळेल.

loksatta analysis drug shortage hit on tb elimination plan
विश्लेषण: क्षयरोगमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होणार का? 
lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री

लखपती दीदी ही अनोखी योजना

‘लखपती दिदी’ या कार्यक्रमातून तीन कोटी भगिनींना लखपती बनविण्याचा संकल्प सुद्धा करण्यात आला आहे. नऊ कोटी महिलांना महिला बचत गटांच्या माध्यमातून अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे. ११ लाख कोटींची गुंतवणूक रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधांसाठी करण्यात येते आहे. यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या गुंतवणुकीतून एकिकडे पायाभूत सुविधा निर्माण होत असताना रोजगारात सुद्धा वृद्धी होणार आहे. शेतकर्‍यांसाठी नॅनो डीएपी ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव आणि थेट बाजारपेठेशी जोडणी यासाठीच्या विविध योजनांचा उहापोह या अंतरिम अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. विकासाची दिशा सांगणारा पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाळणारा असा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. विकसित भारताचा रोडमॅप पूर्णकालिन अर्थसंकल्पातून येईल, हा आत्मविश्वास देणारा सुद्धा हा अर्थसंकल्प आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे पण वाचा- “निर्मला सीतारमण यांना डोकं वापरण्याची मुभा नाही, त्यांच्यापुढे आलेला कागद..”, यशोमती ठाकूर यांची टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज ५८ मिनिटांमध्ये देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आज सादर झालेला अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी आपली अर्थव्यवस्था खूप चांगल्या प्रकारे काम करते आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या सगळ्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली आहे. तसंच महागाई आहे पण ती माफक आहे असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्या देशातल्या पायाभूत सुविधांवर त्यांनी भाष्य केलं आहे. अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत असंही निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.

सबका साथ सबका विकास हेच आमचं लक्ष्य

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला १० वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने काय काय योजना आणल्या आणि कशी प्रगती साधली याची माहिती दिली. सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन मोदी सरकार पुढे गेलं आहे. नव्या योजना, रोजगार निर्मिती यावर आम्ही भर दिला. ग्रामीण विकास, घर, पाणी, स्वयंपकाचा गॅस तसंच बँक खाती उघडण्यासाठी आम्ही वेगाने कार्य केलं. तसंच ८० कोटी लोकांना निशुल्क धान्य पुरवलं. ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नांमध्ये चांगली भर पडल्याचं दिसतं आहे असंही निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.