पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणासाठीच्या तरतुदीमध्ये ११ हजार कोटींनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली नाही, अर्थसंकल्पात मोठमोठे शब्द वापरण्यापेक्षा तरतुदींची अंमलबजावणी अधिक महत्त्वाची असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी १.४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात जवळपास ६३ हजार कोटी शालेय शिक्षणासाठी, ४१ हजार कोटी उच्च शिक्षणासाठी आहेत. मात्र, अर्थसंकल्पात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विशेष तरतूद दिसत नाही. स्वयंप्रभाच्या आधीच शैक्षणिक वाहिन्या सुरू आहेत. मात्र आणखी नवीन शैक्षणिक वाहिन्या सुरू करून काय साध्य होणार हा प्रश्न आहे. डिजिटल शिक्षणाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न असला, तरी पायाभूत शिक्षण सक्षम करण्याची गरज आहे. सुरू असलेल्या वाहिन्यांवरील कार्यक्रमांची गुणवत्ता वाढत नाही. विद्यार्थिर्केंद्री, बहुभाषिकत्व असे शब्द वापरताना मूलभूत शिक्षण प्रक्रिया, प्रशासन सक्षम झाले पाहिजे. उदाहरणार्थ नव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदींनुसार शिक्षक सक्षम होणे हा महत्त्वाचा भाग आहे. मात्र त्यासाठी अर्थसंकल्पात काहीही नाही. एकूण शिक्षणासाठीची आर्थिक तरतूद वाढवली असली, तरी त्याची अंमलबजावणी कशी होते हे महत्त्वाचे आहे. अनेकदा अर्थसंकल्पात तरतूद असूनही खर्च होत नसल्याचे दिसून आले आहे, असे शालेय शिक्षणाबाबत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New education policy ignoring in budget 2022 reaction from education sector zws
First published on: 02-02-2022 at 01:22 IST