scorecardresearch

Bank Holidays in April 2023: लवकरात लवकर उरका बँकेची कामं, एप्रिलमध्ये १५ दिवस बँका राहणार बंद

जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे राहिले असेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण एप्रिलमध्ये बँका १५ दिवस बंद राहणार आहेत.

Bank-Holiday

मार्च महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यानंतर पुढील महिना एप्रिल सुरू होईल, ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल लागू होणार आहेत. खरं तर आता एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे राहिले असेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण एप्रिलमध्ये बँका १५ दिवस बंद राहणार आहेत.

बँका किती दिवस बंद राहणार?

बँकिंग हॉलिडे कॅलेंडरनुसार, एप्रिलमध्ये 15 दिवस बँका बंद राहतील, त्यात प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांसह दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे. एप्रिलमधील बँका म्हणजे महावीर जयंती, बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, संक्रांती/बिजू महोत्सव/बिसू उत्सव, तामिळ नववर्ष दिन, विशू/बोहाग बिहू, बंगाली नववर्ष दिन (नबबरशा), शब-एल- कद्र ईद-उल-फित (रमजान ईद)/गरिया पूजा/जुमात-उल-विदा आणि रमजान ईद (ईद-उल-फितर) या दिवशी बंद राहतील.

इतके दिवस बँका बंद राहणार

१ एप्रिल (शनिवार) – वार्षिक खाती बंद झाल्यामुळे (मिझोरम, चंदीगड, मेघालय आणि हिमाचल प्रदेश) वगळता बँका बंद राहतील.
४ एप्रिल (मंगळवार) – महावीर जयंतीनिमित्त गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू, राजस्थान, लखनऊ, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.
५ एप्रिल (बुधवार) – बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त हैदराबादमध्ये बँका बंद राहणार आहेत.
७ एप्रिल (शुक्रवार) – गुड फ्रायडेनिमित्त त्रिपुरा, गुजरात, आसाम, राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश, श्रीनगरवगळता बहुतांश राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.
१४ एप्रिल (शुक्रवार) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/बोहाग बिहू/चिरावबा/वैसाखी/बैसाखी/तामिळ नववर्ष दिन/महाविसुभा संक्रांती/बिजू महोत्सव/बिसू उत्सव या दिवशी बँका बंद राहतील.
१५ एप्रिल (शनिवार) – त्रिपुरा, आसाम, केरळ, बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये विशू / बोहाग बिहू / हिमाचल दिन / बंगाली नववर्ष दिन (नबबरशा) निमित्त बँका बंद आहेत.
१८ एप्रिल (मंगळवार) – शब-ए-कदरानिमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
२१ एप्रिल (शुक्रवार) – त्रिपुरा, जम्मू आणि श्रीनगर, केरळमध्ये ईद-उल-फितर (रमजान ईद)/गरिया पूजा/जुमत-उल-विदा निमित्त बँका बंद आहेत.
२२ एप्रिल (शनिवार) – रमजान ईद (ईद-उल-फितर) आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 15:35 IST

संबंधित बातम्या