Lay Off News: अनेक दशके अथक आणि उत्तम कामगिरीनंतरही नोकरीवरून काढून टाकल्यानंतर जाणवणाऱ्या चिंता आणि अनिश्चिततेबद्दल एका व्यक्तीने रेडिटवर पोस्ट केली आहे. त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मला कामावरून काढून टाकण्यात आले. मी ४५ वर्षांचा आहे आणि मला खूप भीती वाटते.”
“मी अनेक वर्षांपासून खूप चांगले पैसे कमवत होतो, पण मला वाटतं की मी ले ऑफच्या टप्प्यात अडकलो आहे. चिंता आणि आत्म-शंकेने मी पूर्णपणे बेजार झालो आहे. स्पष्टपणे सांगायचे तर, मी कधीही स्वतःला इजा करणार नाही; माझ्याकडे असे लोक आहेत ज्यांच्यावर मी खूप प्रेम करतो आणि त्यांना कधीही अशा प्रकारची वेदना देऊ शकत नाही”, असे या व्यक्तीने पोस्टमध्ये लिहिले आहे.
कुटुंबाला आधार देताना नोकरी नसण्याचा आर्थिक आणि भावनिक ताणही त्याने शेअर केला आहे. “जर मला एखादी नवीन नोकरी मिळाली, तर आम्हाला आमचे घर गमवावे लागणार नाही. पण बेरोजगार असताना मुले कॉलेजला जात आहेत हे खरोखरच भयानक आहे. गेल्या २५ वर्षांत मला नोकरी शोधावी लागली नाही. मी माझे नाव आणि माझ्या क्षेत्रात एक अतिशय विशेष कौशल्य निर्माण करण्यात २० वर्षे घालवली. आता मला हरवल्यासारखे वाटते. आणि समस्या अशी आहे की मला आधीच नैराश्याची प्रवृत्ती आहे, म्हणून वेळ खूपच भयानक आहे.”
या रेडिट युजरने व्यावहारिक सल्ला मागितला आणि म्हटले, “यापूर्वी कोणी यातून गेले आहे का? मी सहानुभूती किंवा सामान्य प्रोत्साहन शोधत नाहीये. मला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की, मी सध्या ज्या खड्ड्यात आहे त्यातून लोक कसे बाहेर पडले.”
त्याने इतर युजर्सनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केले आणि संभाव्य कंपन्यांपर्यंत पोहोचण्यास आणि त्याच्या अर्ज अपडेट करण्यास सुरुवात केली. “तुमच्यापैकी अनेकांनी मला टिप्पण्यांमध्ये स्पर्धक कंपन्यांवर लक्ष केंद्रित करण्यास, त्यांची यादी बनवण्याचा सल्ला दिला. तुम्ही बरोबर होता!!”