Rs 100 Daily SIP VS Rs 3000 Monthly SIP : पूर्वीच्या पारपंरिक गुंतवणूक पर्यायांना बगल देत अलीकडच्या काळात लोकांचा म्युच्युअल फंड व भांडवली बाजाराकडे कल वाढला आहे. मात्र, भांडवली बाजारात गुंतवणूक करताना मोठा धोका देखील पत्करावा लागतो. त्या तुलनेत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं कमी धोकादायक मानलं जातं. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी हा सर्वात लोकप्रिय पर्याय बनला आहे. दरमहा १०० रुपयांपासून गुंतवणूक करण्याच्या पर्यायासह एसआयपीमध्ये प्रत्येक गुंतवणूकदाराला त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणुकीची रक्कम व कालावधी ठरवण्याचा पर्याय मिळतो.

जे लोक एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवू शकत नाहीत, मात्र त्यांना थोडे थोडे पैसे साठवून, गुंतवून मोठी आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करायची आहेत, अशा लोकांसाठी एसआयपी हा चांगला पर्याय असल्याचं आर्थिक सल्लागार सूचवतात. परंतु, एसआयपीमध्ये गुंतवणूक कशी करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. दररोज पैसे गुंतवायचे की मासिक चक्र निवडायचं असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. दररोज १०० रुपये गुंतवावे की महिन्यातून एकदाच ३००० रुपये गुंतवावे? कोणत्या गुंतवणुकीद्वारे अधिक पैसे मिळतील असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो.

तुम्ही डेली (दररोज) एसआयपीचा पर्याय निवडला तर प्रत्येक कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार, सण-समारंभांच्या सुट्ट्या वगळता) काही पैसे तुमच्या खात्यातून थेट गुंतवले जातात. म्हणजेच महिन्यातून २० ते २२ दिवसांत दररोज १०० रुपये याप्रमाणे जवळपास २२०० रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवले जातात. दुसरा पर्याच म्हणजे दर महिन्याच्या निश्चित तारखेला थेट ३,००० रुपये गुंतवणे. दररोजच्या SIP मध्ये, तुम्ही मासिक एकरकमी पैसे गुंतवण्याऐवजी प्रत्येक व्यावसायिक दिवशी म्युच्युअल फंडामध्ये थोडी रक्कम गुंतवता. उदाहरणार्थ, बाजार उघडल्यावर तुम्ही दररोज १०० रुपये गुंतवू शकता, साधारणपणे २०-२२ व्यवसाय दिवस दरमहा, सुमारे २,२०० रुपये प्रति महिना गुंतवू शकता. दुसरा पर्याय म्हणजे दर महिन्याच्या एका एका निश्चित तारखेला ३,००० रुपये गुंतवणे.

काय फरक पडेल?

अनेकांना प्रश्न पडला असेल की अशी वेगवेगळी गुंतवणूक केल्यामुळे काय फरक पडेल? तर, फंडाच्या खरेदीच्या दिवशी त्याची नेट असेट व्हॅल्यू (एनएव्ही) किती आहे, यावर मुख्य फरक अवलंबून असतो. खरेदीच्या दिवशी फंडाची एनएव्ही जास्त किंवा कमी असल्यावर तुम्ही दर महिन्याला किती युनिट्स खरेदी करू शकता यावर परिणाम होतो. त्याचा तुमच्या गुंतवणुकीच्या परताव्यावर थेट परिणाम होतो.

Invest Rs 100 Daily Vs Rs 3000 Per Month

चला तर जाणून घेऊया दोन वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीद्वारे तुमचा परतावा कसा कमी जास्त होतो.

दररोज १०० रुपयांची एसआयपी केली तर?

तुम्ही दररोज १०० रुपये गुंतवले तर तुमची महिनाअखेर २२०० रुपयांची गुंतवणूक झालेली असेल. तुम्ही २० वर्षे ही रक्कम गुंतवत राहिलात तर तुमची एकूण गुंतवणूक असेल ५.२८ लाख रुपये. सरासरी १२ टक्के वार्षिक परताव्यासह तुम्हाला २० वर्षांनी १४.९५ लाख रुपये मिळतील.

दररोजची गुंतवणूक – १०० रुपये
२० वर्षांमधील एकूण गुंतवणूक – ५.२८ लाख रुपये
परतावा (अंदाजे) – १४.९५ लाख रुपये
तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम – २०.२३ लाख रुपये

दर महिन्याला ३,००० रुपयांची एसआयपी केली तर?

दुसऱ्या बाजूला तुम्ही दर महिन्याला ३,००० रुपयांची गुंतवणूक केलीत तर तुम्ही २० वर्षांमध्ये एकूण ७.२ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असेल. यातून तुम्हाला २०.३९ लाख रुपयांच्या परताव्यासह एकूण २७.५९ लाख रुपये मिळतील.

दर महिन्याची गुंतवणूक – ३,००० रुपये
२० वर्षांमधील एकूण गुंतवणूक – ७.२ लाख रुपये
परतावा (अंदाजे) – २०.३९ लाख रुपये
तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम – २७.५९ लाख रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणजेच तुम्ही ३,००० रुपयांची मासिक एसआयपी केलीत तर तुम्हाला १.९२ लाख रुपये अधिकचे गुंतवावे लागतील. मात्र, त्याद्वारे तुम्हाला अधिकचे ५.४४ लाख रुपये मिळतील.