Lic Dhan Varsha Policy : भारतीय आयुर्विमा महामंडळाची( LIC) धन वर्षा ही पॉलिसी ३१ मार्चनंतर बंद होणार आहे. नवीन आर्थिक वर्षापासून ही पॉलिसी खरेदी करता येणार नाही. ही एक उत्तम टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे, ज्यामध्ये तुम्हाला परताव्यासाठी २ पर्याय दिले जातात. एका पर्यायामध्ये जमा केलेल्या रकमेच्या १० पटपर्यंत मृत्यू लाभ म्हणून दिला जातो. आज तुम्हाला या पॉलिसीबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. विमाधारकाला विम्याच्या रकमेसह या पॉलिसीमध्ये जमा केलेली रक्कम देखील परत मिळते. ही पॉलिसी लहान वयात खरेदी करता येते. या पॉलिसी अंतर्गत पहिल्या पर्यायामध्ये १० लाख रुपयांच्या सिंगल प्रीमियमवर १२.५ लाख रुपये मृत्यू लाभ उपलब्ध आहेत. तर दुसऱ्या पर्यायामध्ये खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी किंवा कुटुंबाला ९३ लाख रुपये दिले जातात.
किती वयापासून गुंतवणूक करता येईल
ही पॉलिसी खरेदी करण्याचा निकष असा आहे की, मुदतपूर्तीच्या वेळी ग्राहकाचे वय किमान १८ वर्षे असावे. ही पॉलिसी दोन पर्यायांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. पहिली मुदत १० वर्षे आणि दुसरी १५ वर्षे आहे. जर एखाद्या व्यक्तीला १० वर्षांची पॉलिसी घ्यायची असेल तर त्याचे वय किमान ८ वर्षे असावे. दुसरीकडे जर एखाद्याला १५ वर्षांची पॉलिसी घ्यायची असेल तर किमान वय ३ वर्षे असावे.
एकाच योजनेतील परताव्यात इतका मोठा फरक का?
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचे वय आहे. तुम्ही १० पट रिटर्नचा पर्याय निवडल्यास तुमचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही. जेव्हा तुम्ही १० वर्षांची पॉलिसी खरेदी करता, तेव्हाही हा निकष लागू असतो. जर तुम्ही १५ वर्षांसाठी पॉलिसी खरेदी केली तर तुमचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही. दुसरीकडे १.२५ पट परतावा असलेली पॉलिसी वयाच्या ६० वर्षांपर्यंत गुंतवता येते.
९३ लाख रुपये कसे मिळवायचे?
पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या १०व्या वर्षी मृत्यू झाल्यास ९१,४९,५०० रुपये (८७,४९,५०० रुपये + ४,००,००० रुपये) मिळतील. तर जर तो १५व्या वर्षी मृत्युमुखी पडला, तर त्या व्यक्तीला ९३,४९,५०० रुपये ( ८७,४९,५०० रुपये + ६,००,००० रुपये) मिळतील. जर एखादी व्यक्ती पॉलिसीचा १५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत जिवंत राहिली तर त्याला १६ लाख रुपये मिळतील.