वॉशिंग्टन, पीटीआय

भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर चालू वर्षात ६.१ टक्के राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी वर्तविला. आयएमएफने एप्रिलमध्ये वर्तविलेल्या अंदाजात आता ०.२ टक्के वाढीची सुधारणा केली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सरलेल्या २०२२ च्या चौथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त दिसून आला. देशांतर्गत गुंतवणुकीत वाढ झाल्याचा हा परिणाम होता, असे ‘आयएमएफ’ने ताज्या टिपणात म्हटले आहे.

परिणामी एप्रिलमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजामध्ये आता ०.२ टक्के वाढ करण्यात आली असून, चालू वर्षात विकास दर ६.१ टक्के राहणे अपेक्षित असल्याची तिने पुस्ती जोडली आहे. त्याच वेळी, जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जो मागील वर्षी ३.५ टक्के होता, तो २०२३ आणि २०२४ मध्ये ३ टक्क्यांवर घसरण्याचा ‘आयएमएफ’चा कयास आहे.

हेही वाचा – चढ-उताराच्या हिंदोळ्यावर सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण

हेही वाचा – ‘जेएलआर’च्या वाढत्या विक्रीच्या जोरावर; टाटा मोटर्सला तिमाहीत ३,२०३ कोटींचा नफा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगभरात मध्यवर्ती बँकांनी महागाईवर नियंत्रणासाठी व्याजदरात तीव्र स्वरूपात वाढ केली आहे. याचा फटका आर्थिक घडामोडींना बसला आहे. जागतिक पातळीवरील महागाई मागील वर्षी ८.७ टक्के होती. ही महागाई २०२३ मध्ये ६.८ टक्के आणि २०२४ मध्ये ५.२ टक्के राहील, असा अंदाजही ‘आयएमएफ’ने वर्तविला आहे.