पीटीआय, नवी दिल्ली
देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या अदानी समूहाने त्यांचा आतापर्यंतचा सर्वाधिक ९०,००० कोटी रुपयांचा करपूर्व नफा आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नोंदवला आहे. समूहाचे व्याज, घसारा आणि करांपूर्वीचे उत्पन्न सहा वर्षांत तिप्पट झाले आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील २४,८७० कोटी रुपयांवरून २०२४-२५ मध्ये (एप्रिल २०२४ ते मार्च २०२५) ते ८९,८०६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ मध्ये ते ८२,९७६ कोटी रुपये होते, ज्यात ८.२ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये समूहाला ४०,५६५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तर एकूण मालमत्ता ६,०९,१३३ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
विमानतळांपासून ते अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या अदानी समूहाचे एकूण कर्ज आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील २.४१ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २.९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर समूहाकडे ५३,८४३ कोटी रुपयांची रोख गंगाजळी आहे. ती विचारात घेता निव्वळ कर्जदायीत्व २.३६ लाख कोटी रुपये होते.