IIT Bombay: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने त्यांना कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळाल्याची माहिती दिली आहे. आयआयटी बॉम्बेला अनेकदा काही संस्था किंवा कंपनीकडून देणग्या मिळतात. पण आताची विशेष बाब म्हणजे ही देणगी कोणत्याही कंपनीऐवजी आयआयटी बॉम्बेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिली आहे. आयआयटी बॉम्बेच्या १९९८ च्या बॅचच्या रौप्य महोत्सवी पुनर्मीलनच्या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांनी संस्थेला ५७ कोटी रुपयांची देणगी देऊन ऐतिहासिक विक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वीही संस्थेला मोठ्या देणग्या मिळाल्यात

यापूर्वी १९७१ च्या बॅचने रौप्य महोत्सवी सोहळ्यात भारतीय तंत्रज्ञान संस्था बॉम्बेला ४१ कोटी रुपयांची संपूर्ण रक्कम भेट दिली होती. संस्थेच्या २००हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी २०२३ मध्ये प्राप्त झालेल्या ५७ कोटी रुपयांच्या रकमेसाठी योगदान दिले आहे. या देणग्यांबद्दल माहिती देताना माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाने सांगितले की, आमच्या बॅचचे विद्यार्थी अनेक मोठ्या स्टार्टअप कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, सामाजिक संस्था आणि एनजीओ इत्यादी १०० हून अधिक शहरांमध्ये काम करतात. संस्थेच्या काही खास आठवणींनी आम्हाला एकमेकांशी जोडून ठेवले आहे.

हेही वाचाः इन्फोसिसला मोठा झटका, जागतिक कंपनीने १.५ अब्ज डॉलरचा करार केला रद्द

IITला ग्लोबल कंपनी बनवण्यास मदत करायचीय

इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आयआयटी बॉम्बेला देणग्या देणाऱ्यांमध्ये सिल्व्हर लेकचे व्यवस्थापकीय संचालक अपूर्व सक्सेना, गुगल डीपमाइंडच्या एआय रिसर्चचे दिलीप जॉर्ज, ग्रेट लर्निंगचे सीईओ लक्षाराजू, अनुपम बॅनर्जी, एमडी यांसारख्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. तसेच वेक्टर कॅपिटलचा समावेश आहे. ईटीशी बोलताना लक्षाराजू म्हणाले की, आयआयटी बॉम्बेसारख्या संस्था केवळ सरकारी निधीच्या जोरावर परदेशी संस्थांशी स्पर्धा करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत या संस्थेचे माजी विद्यार्थी योगदान देऊन संस्थेला जागतिक स्तरावर मोठे करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

निधी कुठे वापरला जाणार?

आयआयटी बॉम्बेने दिलेल्या माहितीनुसार, संस्था विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या देणगीचा उपयोग अनेक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करणार आहे. या पैशातून संस्था अनेक विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना निधी देऊ शकणार आहे. यामध्ये एव्हरग्रीन प्रोजेक्ट आणि मेकरस्पेस लॅब्स यांसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alumni of iit bombay make institute rich donate rs 57 crore vrd
First published on: 26-12-2023 at 11:58 IST