मुंबई: मालवाहतूक क्षेत्रातील अश्विनी कंटेनर मूव्हर्स लिमिटेड लवकरच प्रारंभिक समभाग विक्रीसह (आयपीओ) भांडवली बाजारात प्रवेश करत असून, एनएसई इमर्ज’ या एसएमई मंचावर समभागांच्या सूचीबद्धतेच्या या प्रस्तावाला ‘सेबी’कडून मंजुरीची मोहोर उमटली जाण्याची कंपनी वाट पाहात आहे.

या आयपीओमधून मिळणारी रक्कम ट्रक खरेदीसाठी भांडवली खर्चाची गरज पूर्ण करण्यासाठी आणि कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची पूर्णपणे किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी कंपनीकडून केला जाणार आहे. कंपनी या माध्यमातून प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचे ५० लाख समभाग विक्रीसाठी खुले करू पाहत आहे, ज्याचे प्रमाण तिच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या ३३.३३ टक्के असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विनी कंटेनर मूव्हर्स ही कंपनी कंटेनराइज्ड ट्रकमधून मालवाहतुकीत कार्यरत असून, तिच्या व्यवसायाचा महत्त्वाचा भाग महाराष्ट्र आणि गुजरातमधून आहे. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत कंपनीकडे २५० हून अधिक वाहनांचा ताफा आहे ज्यामध्ये २० फूट आणि ४० फूट उंचीची कंटेनर वाहने आहेत. कंपनी प्रामुख्याने बी२बी ग्राहकांना प्रमाणित जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीसह सेवा देते. कॉर्पोरेट प्रोफेशनल्स कॅपिटल हे आयपीओसाठी प्रधान व्यवस्थापक, तर बिगशेअर सर्व्हिसेस हे निबंधक आहेत.