Bank Holidays In July 2023 : देशभरातील बँका जुलै २०२३ मध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवार पकडून जवळपास १५ दिवस बंद राहणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका खुल्या असतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद राहतील आणि काही प्रादेशिक सुट्ट्या राज्यानुसार दिल्या जातील. कारण प्रादेशिक सुट्ट्या संबंधित राज्य सरकारे ठरवत असतात. तसेच बँकिंग नियामकाने रविवारी बँका बंद ठेवणे बंधनकारक केले आहे.

जुलैमध्ये एकूण १५ सुट्ट्या असतील

जुलै महिन्यात शनिवार आणि रविवार वगळून आठ सुट्ट्या आहेत. सुट्ट्यांची सुरुवात ५ जुलैपासून गुरू हरगोविंदजींच्या जन्मदिवसापासून सुरू होणार आहे आणि २९ जुलै रोजी मोहरमच्या सुट्टीसह संपणार आहे. काही राज्ये वगळता भारतातील सर्व बँकांना या सुट्ट्या लागू असणार आहेत. दुसरीकडे ७ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारशी निगडीत आहेत. जुलै महिन्यात ५ रविवार आणि दोन शनिवार सुट्टी असणार आहेत. जुलै महिन्यात एकूण १५ सुट्ट्या आहेत. बँकेत कोणाचे फार महत्त्वाचे काम असेल, तर बँकेच्या सुट्ट्या पाहूनच घराबाहेर पडावे लागणार आहे. एटीएम, रोख ठेवी, ऑनलाइन बँकिंग आणि मोबाइल बँकिंग नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

हेही वाचाः Make In India : आता गुगललाही पिक्सेलचं उत्पादन भारतात करायचंय; देशी कंपन्यांशी बोलणी सुरू

२००० रुपयांच्या नोटा जमा करता येणार

दुसरीकडे देशातील सर्व बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत. मे महिन्यात RBI ने २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याचे आदेश दिले होते. देशातील जनतेला या २००० रुपयांच्या नोटा सप्टेंबर अखेरपर्यंत जमा करा, असे सांगण्यात आले आहे. ज्यावर सातत्याने काम सुरू आहे. जर एखाद्याला जुलैमध्ये २००० रुपयांच्या नोटा मिळाल्या आणि त्या बँकांमध्ये जमा करायच्या असतील तर अशा लोकांना बँकेच्या सुट्टीनुसार त्याचे नियोजन करावे लागेल.

हेही वाचाः विलीनीकरणापूर्वीच HDFC लिमिटेडचा मोठा निर्णय, शैक्षणिक कर्ज कंपनी HDFC क्रेडिलामधील ९० टक्के हिस्सा विकला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँकेच्या सुट्ट्यांची सगळी यादी

२ जुलै २०२३: रविवार
५ जुलै २०२३: गुरू हरगोविंद सिंग जयंती (जम्मू, श्रीनगर)
६ जुलै २०२३: MHIP दिवस (मिझोरम)
८ जुलै २०२३: दुसरा शनिवार
९ जुलै २०२३: रविवार
११ जुलै २०२३: केर पूजा (त्रिपुरा)
१३ जुलै २०२३: भानू जयंती (सिक्कीम)
१६ जुलै २०२३: रविवार
१७ जुलै २०२३: यू तिरोट सिंग डे (मेघालय)
२१ जुलै २०२३: ड्रुकपा त्से-झी (गंगटोक)
२२ जुलै २०२३: चौथा शनिवार
२३ जुलै २०२३: रविवार
२९ जुलै २०२३: मोहरम (जवळजवळ सर्व राज्यांमध्ये)
३० जुलै २०२३: रविवार
३१ जुलै २०२३: हुतात्मा दिन (हरियाणा आणि पंजाब)