मुंबई: बिटकॉइन या आभासी चलनाने मंगळवारच्या सत्रात दोन वर्षांच्या कालावधीनंतर ५० हजार डॉलरची उच्चांकी पातळी गाठली आहे. जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य ४९,८९९ म्हणेजच ५०,००० अमेरिकी डॉलरच्या वेशीवर पोहोचले असून, भारतीय रुपयात सध्या एका बिटकॉइनचे मूल्य सुमारे ४१ लाख २५ हजार रुपये झाले आहे.

हेही वाचा >>> अग्रेसर महाराष्ट्र म्युच्युअल फंड गुंतवणूकसंपन्नही! राज्यातून दरडोई सरासरी १.६९ लाखांची गुंतवणूक

Tejasvi Surya files nominations papers
पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?
Increase in average life expectancy of Indians
भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये
rs 234 cr from bharti airtel 55 cr from navayuga engineering donated through electoral bond: to bjp
‘भारती एअरटेल’चे भाजपला २३४ कोटी; ‘नवयुग इंजीनियरिंग’कडून ५५ कोटी देणगी

विद्यमान वर्षात जगभरातील मध्यवर्ती बँकांसह अमेरिकी मध्यवर्ती बँकेने दिलेले व्याजदर कपातीचे संकेत आणि बिटकॉइनमधील एक्स्चेंज ट्रेडेड फंडाला विद्यमान महिन्यात अमेरिकेने परवानगी दिल्याने बिटकॉइनच्या मूल्यामध्ये तेजी दिसते आहे. या वर्षी आतापर्यंत बिटकॉइनने १६.३ टक्के वाढ नोंदवली आहे. ही बिटकॉइनची २७ डिसेंबर २०२१ नंतरची सर्वोच्च पातळी आहे. गेल्या महिन्यात स्पॉट ईटीएफ सादर केल्यानंतर बिटकॉइनसाठी ५०,००० डॉलर हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बिटकॉइनचे मूल्य ५० हजार अमेरिकी डॉलरच्या पुढे गेल्याने तमाम अर्थविश्वाचे डोळे विस्फारले गेले आहेत. गेल्यावर्षी म्हणजेच २०२३ सालात बिटकॉइनचे मूल्य १६० टक्क्यांहून अधिक वधारले होते. जगातील मोठे क्रिप्टो एक्सचेंज हे मोठ्या धक्क्यांमधून सावरत असताना हे घडणे विशेष लक्षणीय मानले जात आहे. जागतिक पातळीवरील ‘एफटीएक्स’ हे क्रिप्टो एक्स्चेंज दिवाळखोर झाले, तर दुसरे क्रिप्टो एक्स्चेंज बायनान्स विरुद्ध खटला सुरू आहे.

हेही वाचा >>> सरकारी कंपन्यांच्या समभागातील घसरणीने गुंतवणूकदारांना ३.७९ लाख कोटींची झळ

जगातील काही देशांमध्ये बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. भारतात मात्र बिटकॉइनला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता नसली, तरी मोठ्या करांच्या भाराची त्या व्यवहारांवर जरब आहे. अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेनेदेखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेसारख्या कोणत्याही मध्यवर्ती बॅंकेचे या चलनावर आणि त्याच्या व्यवहारांवर नियंत्रण वा नियमन नाही. तरी जगभरासह भारतात देखील बिटकॉइनच्या साहाय्याने व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे बिटकॉइन हा एक गुंतवणुकीचा पर्याय होऊ पाहत आहे.