मुंबई : अंतर्गत सजावट आणि पर्यावरणानुकूल वास्तुरचना उपाय प्रदात्या ब्लू पेबल लिमिटेडची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या २६ मार्चला खुली होत असून, ती २८ मार्चला बंद होईल. या माध्यमातून १०.८० लाख नव्याने समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करून १८.१४ कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची कंपनीची योजना आहे.

या लघू आणि मध्यम उद्योग (एसएमई) आयपीओसाठी प्रति समभाग १५९ रुपये ते १६८ रुपये असा किंमत पट्टा कंपनीने निर्धारित केला आहे. आयपीओपश्चात ब्लू पेबलचे समभाग ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. हेम सिक्युरिटीज हे या आयपीओ प्रक्रियेचे प्रधान व्यवस्थापक आहेत. आयपीओतून येणाऱ्या निधीचा वापर खेळत्या भांडवलाची गरज आणि अतिरिक्त यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी कंपनीकडून करण्यात येणार आहे.

SEBI approval of ICRA subsidiary for ESG rating
ईएसजी’ मानांकनासाठी इक्राच्या उपकंपनीला सेबीची मान्यता
Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 22 March 2024: विक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्या-चांदीचे दर थंडावले, १० ग्रॅमची किंमत आता…

‘रेडिओवाला’ची ७२ ते ७६ रुपयांना प्रारंभिक भागविक्री

 बी२बी धाटणीच्या बड्या वाणिज्य संकुलांमध्ये इन-स्टोअर रेडिओ (संगीत) सेवा आणि डिजिटल दृक-श्राव्य जाहिरात उपायांसारख्या डिजिटल सेवांमध्ये कार्यरत कंपनी रेडिओवाला नेटवर्क लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे १८.७५ कोटी रुपये उभारण्याची योजना प्रस्तावित केली आहे.

आघाडीचे गुंतवणूकदार आशीष कचोलिया यांच्याकडे १०.६० टक्के भागभांडवली मालकी असलेल्या या कंपनीकडून येत्या २७ मार्च ते २ एप्रिल २०२४ दरम्यान समभागांची सार्वजनिक विक्री केली जाणार आहे. लघू आणि मध्यम उद्योग (एसएमई) आयपीओसाठी प्रति समभाग ७२ रुपये ते ७६ रुपये असा किंमत पट्टा कंपनीने निर्धारित केला आहे. आयपीओपश्चात रेडिओवालाचे समभाग ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. नार्नोलिया फायनान्शियल सर्व्हिसेस हे या आयपीओ प्रक्रियेचे प्रधान व्यवस्थापक आहेत. देशभरातील संघटित विक्री क्षेत्रातील अनेक नामांकित नाममुद्रा व उद्योग घराणी कंपनीच्या सेवांच्या ग्राहक आहेत तसेच देशाबाहेर संयुक्त अरब अमिरात, मेक्सिको, श्रीलंका आणि आखाती देशात तिचा व्यवसाय फैलावला आहे. आयपीओतून येणाऱ्या निधीचा वापर तंत्रज्ञानावरील अतिरिक्त गुंतवणुकीसाठी आणि खेळत्या भांडवलाची गरज म्हणून कंपनीकडून करण्यात येणार आहे.