जगभरात कच्च्या हिऱ्यांच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोना काळानंतर अनेक ग्राहक चैनीच्या वस्तूंपासून दुरावले आहेत. झिम्निस्की ग्लोबल रफ डायमंड इंडेक्सनुसार, किमती एका वर्षातील सर्वात कमी आहेत. हिऱ्याच्या किमती कमी होण्याचे कारण दागिन्यांच्या विक्रीत झालेली घट आहे, असंही उद्योगपतींचं म्हणणं आहे. २०२१ आणि २०२२ च्या तुलनेत यंदा बाजार नरम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे आगामी काळात कच्च्या हिऱ्यांच्या किमती सुधारू शकतात. गेल्या वर्षीच्या नवरात्री-दसरा कालावधीच्या तुलनेत यंदा दसर्‍यादरम्यान प्रमाणित पॉलिश्ड हिऱ्यांच्या किमतीत ३५ टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे. ET च्या अहवालानुसार हिऱ्यांच्या काही श्रेणींची किंमत आता २००४ मध्ये असलेल्या शेवटच्या स्तरावर आहे.

…म्हणून घट नोंदवली गेली

सेन्को गोल्ड अँड डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुवणकर सेन म्हणतात की, जगातील ९० टक्के कच्चे हिरे पॉलिश करून विकण्यासाठी भारत देश प्रयत्नशील आहे. तसेच भारतीय हिरा व्यापारी देशांतर्गत बाजारपेठेत कमी किमतीत हिरे विकू पाहत आहे. हिऱ्याच्या किमती कमी झाल्यामुळे भारतातील त्यांच्या स्टोअरमध्ये दसऱ्यादरम्यान विक्रीत २० टक्के वाढ झाली आहे. आता ग्राहकांनी हिऱ्यांऐवजी इतर सेवा निवडण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे ही मोठी घसरण दिसून आली. इतकंच नाही तर विश्लेषकांचा असाही विश्वास आहे की, कोविड महामारीनंतर लोकांनी आता बाहेर खाण्यास सुरुवात केली आहे, लोक इतर देशात प्रवास करीत आहेत आणि चैनीच्या वस्तूंऐवजी अनुभवांवर पैसे खर्च करीत आहेत, जे जगभरातील हिऱ्यांच्या घसरणीचं एक प्रमुख कारण मानलं जात आहे.

loksatta analysis heavy obligations reason behind elon musk delaying tesla in india
विश्लेषण : टेस्लाच्या वाटचालीत स्पीडब्रेकर? जगभर मागणीत घट का? भारतात आगमन लांबणीवर?
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Gold prices hit highs in gold market in Delhi
सोन्याच्या भावाची उच्चांकी गुढी; दिल्लीत भाव ७१ हजार ७०० रुपयांवर पोहोचला

२००४ मध्ये एसआय दर्जाच्या हिऱ्याची किंमत सुमारे ७ हजार डॉलर इतकी होती आणि आजही त्याची तितकीच किंमत आहे. हिर्‍याच्या मार्गात अडथळा आणणारे अनेक घटक समाविष्ट असतात. खडबडीत हिरे मोडून पॉलिश करण्याच्या प्रक्रियेत तयार होणाऱ्या छोट्या हिऱ्यांच्या किमती १०-१५ टक्के कमी झाल्या आहेत. सूरतमधील हिरे व्यापार उद्योगातील ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या अग्रगण्य हिरे व्यापाऱ्यांनीही आपला अनुभव सांगितलं आहे. उद्योग क्षेत्रातील सध्याची मंदी २००८ सालामधील अनुभवापेक्षा वाईट आहे.आर्थिक वर्ष २०२४ च्या एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान पॉलिश्ड हिऱ्यांच्या एकूण निर्यातीत २८.७६ टक्क्यांनी घट झाली आहे, ज्याची रक्कम आर्थिक वर्ष २०२३ मधील याच कालावधीच्या तुलनेत ८७०२.२३ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

हेही वाचाः मोठी बातमी! १७ हजार कोटींचा हिरा व्यापार सूरतला हलवत गुजराती व्यापाऱ्यांचा मुंबईला मोठा धक्का

दोन वर्षांनंतर विक्रमी घसरण झाली

CNN ने स्वतंत्र हिरे विश्लेषक अधान गोलन यांनी सांगितले की, हिरे ही संपूर्णपणे ग्राहक-आधारित बाजारपेठ आहे, ज्यामध्ये हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदीदार मागणी हिऱ्याच्या किमतींवर आणि काही प्रमाणात किरकोळ किमतींवर प्रभाव पाडते. किरकोळ विक्रेत्यांनी जाहिरातींवर लाखो डॉलर्स खर्च करून ग्राहकांच्या मागणीला चालना दिली. हिऱ्यांच्या विक्रीतील दोन विक्रमी वर्षांनंतर किमती घसरल्या आहेत.

हेही वाचाः NPS द्वारे तुम्हाला निवृत्तीनंतर १ लाख मासिक पेन्शन मिळणार अन् करोडपती बनण्याची संधी, गणित समजून घ्या

सीएनएनचा अहवाल काय म्हणतो?

CNN च्या अहवालानुसार, २०२१ आणि २०२२ मध्ये नैसर्गिक हिऱ्याच्या दागिन्यांची मागणी सर्वाधिक होती आणि उद्योग विश्लेषकांना हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आणि २०२४ च्या सुरुवातीस किरकोळ विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. एवढेच नाही तर येत्या काही महिन्यांत कच्च्या हिऱ्यांच्या किमती किंचित वाढू शकतात, असा अंदाज जगातील सर्वात मोठी डायमंड कंपनी डी बियर्सचे प्रवक्ते डेव्हिड जॉन्सन यांनी व्यक्त केला आहे.