नवी दिल्ली : बैजूज या ऑनलाइन शिकवणी मंचाची मालकी असलेल्या थिंक अँड लर्नने कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाची आंशिक पूर्तता केली, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बैजू रवींद्रन यांनी यासाठी वैयक्तिक क्षमतेत उसनवारी केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

शनिवारी २० एप्रिलला बैजूजच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, जमा झालेली रक्कम पगाराच्या ५० ते १०० टक्क्यांच्या दरम्यान आहे. या आंशिक वेतनपूर्ततेवर बैजूजने २५ ते ३० कोटी रुपयांच्या घरात खर्च केला असण्याचा अंदाज आहे. शिक्षक आणि निम्न स्तरातील कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन अदा केले गेले आहे.

हेही वाचा >>> “भारत ७ टक्के विकासदर गाठेल, पण तो पुरेसा नाही कारण…”, RBI च्या चलनविषयक समितीच्या सदस्यांची ठाम भूमिका!

Heena Gavit Resigns from BJP
Heena Gavit : भाजपाला मोठा धक्का, हिना गावितांचा पक्षाला रामराम; अक्कलकुव्यात शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
In Akola vanchit Bahujan Aghadi Zeeshan Hussain application withdrawn from election
वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…
sandeep bajoria withdrawal from yavatmal constituency for maharashtra vidhan sabha election 2024
Yavatmal Vidhan Sabha Constituency : यवतमाळात महाविकास आघाडीला दिलासा, संदीप बाजोरीया यांची माघार
DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
निवडणुकीपूर्वी बदली झालेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत? विरोधकांनी त्यांच्या बदलीची मागणी का केली होती?
ajit ranade resigned
गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा राजीनामा
nagpur district thackeray shiv sena chief devendra godbole resigned from his post
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा

महिन्याचा पगार देण्यासाठी रवींद्रन यांनी वैयक्तिक कर्ज उचलले आहे. हक्कभाग विक्रीतून उभारला गेलेला निधी अजूनही परदेशी गुंतवणूकदारांनी रोखून धरला आहे, असे सूत्रांनी सांगितले. कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन आणि संबंधित खर्चासह परिचालनाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हक्कभाग विक्रीतून २० कोटी अमेरिकी डॉलरचा निधी उभारला आहे.

प्रोसस, जनरल अटलांटिक, सोफिना आणि पीक एक्सव्ही – चार गुंतवणूकदारांच्या गटाने इतर प्रमुख भागधारकांच्या पाठबळासह संस्थापकांच्या विरोधात राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) दावा दाखल केला आहे. यातून कंपनीतील भागभांडवलाच्या रचनेत बदल होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. याप्रकरणी एनसीएलटीपुढे मंगळवारी, २३ एप्रिलला सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या एक दिवस आधीच वेतनपूर्ततेचे पाऊल कंपनीने टाकले आहे.