ऑनलाइन मार्केटप्लेसमुळे जवळपास काहीही खरेदी आणि विक्री करणे आता सहजशक्य झाले आहे. आपण दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या बर्‍याच गोष्टी ऑनलाइन खरेदी करू शकतो. तसेच त्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जाऊन धक्काबुक्की करण्याचीदेखील आता गरज नाही. कारण त्या ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. कधी कधी सामान्य गोष्टीसुद्धा ई-कॉमर्स वेबसाइटवर खूप उच्च किमतीत विकल्या जातात. म्हणून मग आपण त्याकडे पाठ फिरवतो, परंतु ऑनलाइन मार्केट हे फक्त विदेशी वस्तूंपुरत्या मर्यादित असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही चुकताय. अमेरिकेतील एक ई-कॉमर्स साइट भारतीय खाटांची मोठ्या किमतीत विक्री करीत आहे.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर १.१२ लाख रुपयांना खाट उपलब्ध

खाट म्हणजे लाकूड आणि विणलेल्या जूट(तागा)च्या दोर्‍यांपासून बनवलेला मूलभूत पलंग आहे आणि भारतात साधारणतः २,००० ते १०,००० रुपयांना तो विकला जातो. पण Etsy वर एका भारतीय विक्रेत्याद्वारे ती खाट सुमारे १.१२ लाखांमध्ये विकली जात आहे. हे ‘Traditional Indian Bed Very Beautiful Decor’ म्हणून उपलब्ध आहे. ती चांगल्या दर्जाचे साहित्य आणि हाताने बनवलेली असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. खाटेची रुंदी ३६ इंच, उंची ७२ इंच आहे. हे पारंपरिक भारतीय पलंग भारताच्या वेगवेगळ्या भागात आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. उत्तर भारतात याला मांजा, खाट, खटिया किंवा मांजी म्हणतात.

हेही वाचाः ‘या’ बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात केली वाढ; आता तुम्हाला इतका परतावा मिळणार

कचरा पिशवीची किंमतदेखील एक लाख ४२ हजार रुपये

एवढ्या मोठ्या किमतीत खाटा विकणे ही काही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी लक्झरी फॅशन ब्रँड बॅलेन्सियागाने आपली सर्वात महाग कचरा बॅग लॉन्च करून लोकांना आश्चर्यचकित केले होते. ही कंपनी साधी कचऱ्याची पिशवी एक लाख ४२ हजार रुपयांना विकत होती. फॅशन हाऊसच्या फॉल २०२२ च्या रेडी-टू-वेअर कलेक्शनमध्ये जगातील सर्वात महाग कचरा पिशवी प्रदर्शित करण्यात आली होती.

हेही वाचाः एलपीजी विसरा, आता इंडियन ऑइल घरोघरी देणार सीएनजी-पीएनजी कनेक्शन, तुम्हीही असा मिळवू शकता फायदा

Story img Loader