पीटीआय, मुंबई

सामान्य गुंतवणूकदार तत्काळ नफा कमाविण्यासाठी अधिक जोखीम असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये (एफ अँड ओ) व्यवहार करीत असून, हे चिंताजनक आहे, असा इशारा मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी बुधवारी दिला.

भांडवली बाजार नियंत्रक सेबीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नागेश्वरन बोलत होते. ते म्हणाले की, अल्पकालीन दृष्टिकोन हा शाश्वत भांडवल निर्मितीसाठी सर्वाधिक धोकादायक आहे. याचबरोबर आर्थिक विकासालाही मारक आहे. सामान्य गुंतवणूकदारांचे एफ अँड ओ व्यवहारांमधील स्वारस्य वाढते आहे. सेबीच्या अभ्यासानुसार, यातील ९० टक्के व्यवहार जोखीमपूर्ण असल्याने त्यातून सामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. तत्काळ फायद्यांसाठी एफ अँड ओमध्ये सामान्य गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहेत, हे अतिशय चिंताजनक आहे.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 13 March 2024: सकाळ होताच सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात भाव काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एफ अँड ओमधील व्यवहार गुंतागुंतीचे असूनही अल्पावधीत जलद नफा मिळविण्यासाठी त्यात वाढ होत आहे. यातून सामान्य गुंतवणूकदारांची जोखीमही वाढते. आपण दीर्घकाळ भक्कम राहू याची खबरदारी नियामकांनी घ्यायला हवी, असे नागेश्वरन यांनी नमूद केले.