रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. २७ ऑक्टोबर रोजी मुकेश यांना एका ईमेलवर जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, त्यात त्यांना २० कोटी रुपये न दिल्यास गोळ्या घालू, असं सांगितलं आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत

धमकीचं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
bmc employees removed artificial lights on trees
प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविण्यास सुरुवात; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेकडून कारवाई
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
man molests 15 year minor girl in running local train
रेल्वेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

हेही वाचाः ३० दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण करा अन्यथा दररोज १०० रुपये दंड, आरबीआयचा इशारा

गेल्या वर्षीही धमकी मिळाली होती

मुकेश अंबानी यांना गेल्या वर्षीसुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर एका व्यक्तीने दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला फोन करून हॉस्पिटल उडवून देईन आणि मुकेश, नीता अंबानी आणि त्यांच्या दोन्ही मुलांना मारणार असल्याचे सांगितले होते. याबरोबरच आरोपींनी अंबानींचे घर अँटिलियाला बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली होती.

हेही वाचाः Money Mantra : ९ वर्षांत प्राप्तिकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत ९० टक्के वाढ, करदात्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ

घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली

२०२१ मध्येही मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती, त्यानंतर खळबळ उडाली होती. अंबानी यांच्या घर अँटिलियाजवळ कार सापडल्यानंतर त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना कारमधून २० जिलेटिनच्या कांड्या आणि एक पत्र सापडले होते, ज्यामध्ये अंबानी कुटुंबाला धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून काही जणांना अटक केली होती.