पुणे : आरोग्यसुविधांशी निगडित डिजिटल उत्पादनांचा जगभरात पुरवठा करणाऱ्या ‘रोश’ या बहुराष्ट्रीय कंपनीने पुण्यात ‘डिजिटल सेंटर फॉर एक्सलन्स’ हे जागतिक केंद्रांचे मंगळवारी उद्घाटन केले. उद्घाटनावेळी रोश इन्फॉर्मेटिक्स सेंटरचे जागतिक प्रमुख मॉर्टिझ हार्टमन आणि रोश इन्फॉर्मेशन सोल्यूशन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजा जमालमडाका उपस्थित होते.

हेही वाचा >>> सोने खरेदी करताय? मग त्याआधी हे वाचा; केंद्रीय अर्थमंत्रालयाचा आयात शुल्कात १५ टक्के वाढीचा निर्णय

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
women hostel building Nanded
नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !

रोशने पुण्यातील बाणेर भागात दोन लाख चौरस फूट जागेवर हे केंद्र सुरू केले आहे. सध्या या केंद्रात ३५० मनुष्यबळ कार्यरत असणार आहे. आगामी काळात कंपनीकडून मनुष्यबळात तिपटीने वाढ कऱण्याचे नियोजन आहे. डिजिटल आरोग्य सुविधा क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कंपनीकडून केला जात आहे. विदा आणि विश्लेषण, क्लाऊड कॉम्प्युटिंग, कृत्रिम प्रज्ञा आणि मशिन लर्निंग यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर कंपनी करीत आहे. या केंद्रात स्थानिक गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे धोरण कंपनीने अवलंबिले आहे. याचबरोबर देशभरातील आघाडीच्या शिक्षण संस्थांमधील गुणवत्तेलाही संधी दिली जात आहे. आरोग्य सुविधा क्षेत्रात डिजिटल उत्पादने विकसित करून त्यांचा पुरवठा जगभरात केला जाणार आहे.