नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाळ यांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छापे टाकले आहे. महसुली गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंजाळ यांच्या निकटवर्तीयाकडून अघोषित परदेशी चलन जप्त केले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात ईडीने ही कारवाई केली.

हेही वाचा >>> दोन हजारांच्या ८८ टक्के नोटा बँकांकडे जमा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करचुकवेगिरीप्रकरणी ईडीने मुंजाळ यांच्या निवासस्थानी छापे टाकले. या वर्षाच्या सुरूवातीला प्राप्तिकर विभागाने हिरो मोटोकॉर्पच्या दिल्लीतील कार्यालयावर छापे टाकले होते. याचबरोबर मागील वर्षीही प्राप्तिकर विभागाने हिरो मोटोकॉर्पच्या देशभरातील २५ कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यावेळी कंपनीच्या अध्यक्षांच्या निवासस्थानीही छापे टाकण्यात आले होते. करचुकवेगिरी प्रकरणी हे छापे टाकण्यात आले होते.

RBL Bank Fraud Case, 11 Including Senior Officers Booked, Rs 12 Crore Scam, rbl bank scam, rbl bank scam Rs 12 Crore , Senior Officers in RBL Bank scam, Mumbai news,
आरबीएल बँकेची १२ कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह ११ जणांवर गुन्हा, बँकेच्या दक्षता विभागाची तक्रार
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

हेही वाचा >>> देशातील ३ मोठ्या बँकांनी ​​व्याजदर वाढवले, तुमचा EMI महागणार

ईडीच्या कारवाईनंतर हिरो मोटोकॉर्पच्या समभाग राष्ट्रीय शेअर बाजारात मंगळवारी ४ टक्क्याने घसरून ३ हजार ६६ रुपयांवर व्यवहार करीत होता. अखेर तो ३ हजार १०० रुपयांवर बंद झाला. होंडा कंपनीसोबतची भागीदारी हिरो समूहाने २०११ मध्ये संपविली. त्यानंतर पवन मुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली हिरो मोटोकॉर्पने जागतिक पातळीवर विस्ताराचे पाऊल उचलले. कॉन्फेडरेश ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या उद्योग संघटनांचे ते पदाधिकारी आहेत.

समभागाचा ‘रिव्हर्स गिअर’

मुंबई शेअर बाजारात हिरो मोटोकॉर्पच्या समभागात ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. दिवसअखेर तो १००.४५ रुपयांच्या घसरणीसह ३,१०३ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या समभागाच्या बाजारभावानुसार, कंपनीचे ६१,९९२ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.