शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक मोठे अपडेट आले आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणार्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १८ हजार कोटी रुपयांचा १५ वा हप्ता जारी करतील, ज्याचा ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
हेही वाचाः Tata Technologies IPO : अखेर मुहूर्त सापडला! टाटांचा ‘हा’ IPO पुढील आठवड्यात उघडणार
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी ६ हजार रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते. दर ४ महिन्यांनी शेतकर्यांच्या खात्यावर २ हजार रुपये वर्ग केले जातात. केंद्र सरकारने २७ जुलै २०२३ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता जारी केला होता. या योजनेंतर्गत आतापर्यंत १४ हप्त्यांमध्ये २.६२ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत.
हेही वाचाः ‘ही’ महिला चालवते ४१ हजार कोटींची मद्याची कंपनी, पगाराचा आकडा पाहून थक्क व्हाल!
अशा पद्धतीने स्थिती तपासा
- प्रथम PM किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
- येथे तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय मिळेल.
- येथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल.
- नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
- तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर टाका, यानंतर Get Data वर क्लिक करा.
- येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.
- जर तुम्हाला FTO जनरेट झाले आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसत असेल, तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया होत आहे.