मुंबई : शेअर बाजारात नशीब आजमावणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असून अलीकडच्या काही महिन्यांतील बाजार तेजीने लक्षणीय प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. परिणामी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस देशातील डिमॅट खात्यांच्या एकत्रित संख्येने प्रथमच १३ कोटींचा टप्पा ओलांडला आहे, असे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अहवालाने स्पष्ट केले.

सरलेल्या सप्टेंबर महिन्यात ३१ लाख नवीन डिमॅट खात्यांची भर पडली आहे. तर चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीत मासिक आधारावर सरासरी २१ लाख नवीन डिमॅट खाती उघडली गेली आहेत.

heat waves, weather,
यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार
demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी

हेही वाचा… विदा संरक्षणाच्या मुद्द्यावर नियामकांच्या अधिकारांवर गदा येणार नाही – राजीव चंद्रशेखर

गुंतवणुकीची प्रक्रिया कागदरहित हाताळली जाण्यासह, समभाग वा रोख्यांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील जतनासाठी डिमॅट खाती उपयुक्त आहेत. भारतात सध्या कार्यरत असलेल्या एनएसडीएल आणि सीडीएसएल या दोन डिपॉझिटरी संस्था आहेत, ज्यांच्याकडे गुंतवणूकदारांना डिमॅट खाते उघडता येते. सीडीएसएल ही आठ कोटींहून अधिक सक्रिय डिमॅट खात्यांसह देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी असून तिने ७४ टक्के बाजारहिस्सा व्यापला आहे. तर उर्वरित २६ टक्के डिमॅट खाती एनएसडीएलकडे आहेत.

हेही वाचा… स्पाईसजेटमधील हिस्सा गंगवाल विकत घेणार

डिस्काऊंट ब्रोकरची कामगिरी कशी?

‘ग्रो’ या आघाडीच्या दलाली पेढीने (डिस्काऊंट ब्रोकर) १९.९ टक्के बाजार हिश्श्यासह पहिले स्थान कायम राखले आहेत. त्यांच्याकडील डिमॅट खातेधारकांची संख्या ६६ लाखांवर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ ‘झिरोधा’ने १९.४ टक्के बाजार हिस्सा व्यापला असून, त्यांच्याकडील डिमॅट खातेधारकांची संख्या ६५ लाख आहे. ‘एंजलवन’कडे ४९ लाख तर अपस्टॉक्सकडील डिमॅट खातेधारकांची संख्या २२ लाखांवर पोहोचली आहे.

हेही वाचा… व्यापार तूट पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; सप्टेंबरमध्ये ३० टक्के घसरणीसह १९.३७ अब्ज डॉलरवर मर्यादित

डिमॅट, ट्रेडिंगसाठी नामनिर्देशन आवश्यक

भांडवली बाजारात व्यवहार करण्यासाठी उघडण्यात येणारे ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांना नामनिर्देशनाची (नॉमिनी) नोंद करण्यासाठी भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली आहे. ट्रेडिंग आणि डिमॅट खात्यांसाठी नामनिर्देशनाची नोंदणी करणे गुंतवणूकदारांना आवश्यक आहे. हा पर्याय न स्वीकारल्यास ट्रेडिंग आणि डिमॅट खाते गोठवले जाईल, असा इशाराही ‘सेबी’ने दिला आहे.