अदाणी ग्रुपच्या अदाणी ट्रान्समिशन आणि अदाणी एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांना क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) द्वारे नवीन इक्विटी फंड जारी करण्यास मान्यता मिळाली आहे. शनिवारी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निधी उभारणीच्या प्रस्तावावर चर्चा केली आणि त्याला मंजुरी दिली. अदाणी ट्रान्समिशन ८,५०० कोटी रुपये आणि अदाणी एंटरप्रायझेस १२,५०० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.

विशेष म्हणजे हा पैसा अदाणी समूहाकडे जमा केल्याने समूहाला कर्ज फेडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. समूह सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पॅनेल आणि बाजार नियामक सेबीच्या चौकशीखाली असतानाच ही निधी उभारणी केली जात आहे. अदाणी ट्रान्समिशन बोर्डाने QIP द्वारे ८,५०० कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे.

हेही वाचा : PNB च्या ‘या’ लोकप्रिय योजनेत मोठे बदल; गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) द्वारे एकूण २१,००० कोटी रुपये उभारले जातील, असंही अदाणी एंटरप्रायझेस आणि अदाणी ट्रान्समिशनने घोषित केले. अदाणी एंटरप्रायझेसने १२,५०० कोटी रुपये उभारले तर अदाणी ट्रान्समिशनने ८,५०० कोटी रुपये उभारले. दोन्ही कंपन्यांनी बोर्डाच्या बैठकीनंतर स्वतंत्र नियामक फायलिंग्जमध्ये सांगितले की, निधी उभारणीची प्रक्रिया QIP किंवा इतर प्रक्रियेद्वारे शेअर्स आणि/किंवा इतर पात्र सिक्युरिटीज जारी करून केली जाईल.

हेही वाचाः स्पाइसजेट पुन्हा बंद असलेली विमाने उडवण्याच्या तयारीत; एनसीएलटी नोटिशीला दिले हे उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निधी उभारल्यास गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढणार

अदाणी समूहाला आशा आहे की, निधी उभारण्यामुळे समूहाकडून कर्ज फेडण्याच्या क्षमतेबद्दलची चिंता कमी होईल आणि गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात मदत होईल. यूएस आधारित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग ग्रुपच्या आरोपांमुळे अदाणी समूहाच्या गुंतवणूकदारांच्या विश्वासाला धक्का बसला आहे आणि शेअर्सच्या किमती खाली आल्या आहेत. परंतु समूहाच्या व्यवसाय योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावाही अब्जाधीश गौतम अदाणी यांनी केला होता.