मुंबई : अनिश्चिततेत शाश्वत मूल्य असणाऱ्या सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला असून, सरलेल्या जानेवारीमध्ये सोनेआधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात ‘गोल्ड ईटीएफ’मधील ६५७ कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक याचा प्रत्यय देते. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया’ने (अॅम्फी) दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीअखेर देशात कार्यरत गोल्ड ईटीएफ फंडातील एकूण गंगाजळी २७,७७८ कोटी रुपयांवर गेली. डिसेंबर २०२३ अखेर या गंगाजळीचे प्रमाण २७,३३६ कोटी रुपये होते. त्यात सरलेल्या महिन्यात १.६ टक्क्यांची भर पडली.

हेही वाचा >>> ‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठी आणखी ६० दिवसांची मुदतवाढ

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेतील महागाईदर अपेक्षेपेक्षा अधिक राहिल्याने सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिले जात आहे, जेणेकरून महागाईदरावर मात करणारा परतावा त्यातून शक्य आहे. डिसेंबर २०२३ च्या सुरुवातीला २,१०० डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडल्यानंतर सोन्याच्या किंमतींनी नवीन उच्चांक गाठला, परंतु तेव्हापासून त्यात हळूहळू घसरण झाली. रुपयाच्या तुलनेत, सोन्याने गेल्या वर्षभरात बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी झाले आहेत, असे मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे विश्लेषक मेल्विन सँटारिटा यांनी सांगितले. ऑगस्ट २०१९ पासून गोल्ड ईटीएफ गुंतवणुकीमधील चढता क्रम कायम आहे. २०२३ मध्ये, गोल्ड ईटीएफमध्ये २,९२० कोटी रुपयांचा ओघ आला, जो २०२२ अवघा ४५९ कोटी राहिला होता. ‘पेपर गोल्ड’ म्हणून प्रचलित असलेल्या गोल्ड ईटीएफमधील फोलिओ संख्या डिसेंबर २०२२ मध्ये ४९.११ लाखांवरून डिसेंबर २०२३ मध्ये ४९.७२ लाखांवर पोहोचला.

Story img Loader