काही काळापर्यंत डेबिट कार्डशिवाय एटीएम मशीनमधून पैसे काढता येतील, असा विचारही कोणी केला नसेल. पण तंत्रज्ञानाने हे सगळं शक्य करून दाखवलं आहे. आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट किंवा एटीएम कार्डची गरज लागणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रविवारी त्यांचे डिजिटल बँकिंग ऍप्लिकेशन YONO (YONO) अपडेट केले आणि इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली.

एका निवेदनात एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या अखंड आणि आनंददायी डिजिटल अनुभवाच्या अपेक्षा लक्षात घेऊन प्रत्येक भारतीयाला आर्थिक स्वातंत्र्य आणि सोयीसह सक्षम करणारे अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सोल्युशन्स सादर करण्यासाठी SBI कटिबद्ध आहे. त्यामुळेच YONO अॅपला एक फेसलिफ्ट देण्यात आली आहे.

Air India Recruitment 2024
Air India Recruitment 2024 : थेट मुलाखत! एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसकडून १४५ जागांसाठी भरती, २९ हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार
One to three prize shares from moTilal Oswal Financial
मोतीलाल ओसवाल फायनान्शियलकडून एकास तीन बक्षीस समभाग; नफा चारपट वाढीसह ७२४ कोटींवर
global capital market, samir arora, mutual fund, samir arora journey in market, samir arora and global market journey, samir arora work, helios mutual fund, alliance capital management, asset management comapanies, hdfc limited, hdfc bank, samir arora thoughts in hdfc merge,
बाजारातील माणसं : जागतिक भांडवल बाजारातील अनुभवी खेळाडू : समीर अरोरा
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश

हेही वाचाः पोस्टाच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल; अल्पबचत योजनांवर गुंतवणूकदारांना मिळणार मोठा लाभ

इतर बँकांच्या ग्राहकांना YONO मध्ये अनेक सुविधा मिळतील

प्रत्येक भारतीयासाठी YONO बनवण्याचे SBI चे ध्येय पूर्ण होणार आहे. YONO अॅपद्वारे कोणत्याही बँक ग्राहकाला आता YONO च्या नवीन अवतारात स्कॅन आणि पे, संपर्काद्वारे पैसे द्या आणि पैशाची विनंती करा यांसारख्या UPI वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश असेल, असा खारा यांना विश्वास आहे.

हेही वाचाः Money Mantra : LIC कडून धन वृद्धी योजना लाँच, ‘या’ तारखेपर्यंत गुंतवणुकीची संधी

कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना याचा लाभ मिळेल

याव्यतिरिक्त इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल सुविधेअंतर्गत SBI आणि इतर बँकांचे ग्राहक ‘UPI QR कॅश’ कार्यक्षमतेचा वापर करून कोणत्याही बँकेच्या ICCW सक्षम ATM मधून रोख रक्कम काढू शकतात.