Google Employees Salaries Revealed Check List Here : दिवसेंदिवस कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढताना दिसत आहे, यामुळे अनेक कंपन्यांमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या कर्मचार्यांची मागणी वाढत आहे. यादरम्यान वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामगार आणि नोकऱ्यांमध्ये कपात केली जात आहे. पण बहुतांश तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांप्रमाणे गुगल देखील चांगल्या तंत्रज्ञांना स्वतःकडे खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करताना पाहायला मिळत आहे.
यादरम्यान गुगलमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी कंपनीकडून किती पगार दिला जातो यासंबंधीचा तपशील उघड झाला आहे. अनेक मोठ्या कंपन्यांप्रमाणे गुगल देखील कर्मचाऱ्यांना किती पगार दिला जातो हे गुप्त ठेवते, पण व्हिसा डेटामधून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्स ते रिसर्च सायंटीस्ट यांना गुगल नेमका किती पगार देते हे समोर आले आहे.
अमेरिकेतली टेक कंपन्या या मोठ्या प्रमाणात परदेशातील हाय स्किल्ड स्थलांतरित कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहेत. या कंपन्याने अमेरिकेतील लेबर डिपार्टमेंटकडे अशा कर्मचाऱ्यांचा वर्क व्हिसा (एच-१बी) मिळवण्यासाठी पाठवलेल्या फायलिंग्जमधून या कर्मचार्यांना दिल्या जाणाऱ्या पगारासंबंधी माहिती समोर आली आहे.
गुगलमध्ये कोणाला किती पगार मिळतो?
खाली देण्यात आलेली आकडेवारी ही बिझनेस इंसायडरने दिली आहे. तसेच या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत करण्यात आलेल्या ६,८०० अर्जांच्या आधारे ही आकडेवारी काढण्यात आली आहे. यामध्ये गुगलच्या कर्मचाऱ्यांची इक्विटी किंवा बोनस याचा समावेश यामध्ये करण्यात आलेला नाही.
बिझनेस-अॅनालिस्ट रोल (रेंज: ८५,५०० डॉलर ते २३५,००० डॉलर)
- अकाउंट मॅनेजर : ८५,५०० डॉलर ते १६६,००० डॉलर
- फायनान्स अॅनालिस्ट : १०२,००० डॉलर ते २२५,२३० डॉलर
- सर्च क्वालिटी अॅनालिस्ट: १२०,००० डॉलर ते २३५,००० डॉलर
- बिझनेस सिस्टम्स अॅनालिस्ट: १४१,००० डॉलर ते २०१,८८५ डॉलर
गुगल इंजिनिअर्सचा पगार (रेंज – ८५,००९.६० डॉलर ते ३४०,००० डॉलर)
- कस्टमर इंजिनिअर: ८५,००९.६० डॉलर ते २२८,००० डॉलर
- सेक्युरिटी इंजिनिअर: ९७,००० डॉलर ते २३३,००० डॉलर
- कस्टमर इंजिनिअर अभियंता: १०८,००० डॉलर ते २२८,००० डॉलर
- नेटवर्क इंजिनिअर: १०८,००० डॉलर ते १९५,००० डॉलर
- सॉफ्टवेअर इंजिनिअर: १०९,१८० डॉलर ते ३४०,००० डॉलर
- डेटा इंजिनिअर: १११,००० डॉलर ते १७५,००० डॉलर
- इलेक्ट्रिकल इंजिनिअर: ११९,००० डॉलर ते २०३,००० डॉलर
- सिलिकॉन डिझाइन व्हेरिफिकेशन इंजिनिअर : डॉलर १२६,००० ते २०७,०५० डॉलर
- हार्डवेअर इंजिनिअर : १३०,००० डॉलर ते २८४,००० डॉलर
- सॉफ्टवेअर इंजिनिअर, साइट रिलायबिलीटी इंजिनिअर: १३३,००० डॉलर ते २५८,००० डॉलर
- अॅप्लिकेशन इंजिनिअर: १३८,००० डॉलर ते १९९,००० डॉलर
- सिलिकॉन जनरलिस्ट: १४४,००० डॉलर ते २२३,००० डॉलर
- सिलिकॉन इंजिनिअर: १४६,००० डॉलर ते २५२,००० डॉलर
- सॉफ्टवेअर इंजिनिअर (Waymo): १५०,००० डॉलर ते २८२,००० डॉलर
- रिसर्च इंजिनिअर: $१५३,००० ते $२६५,०००
- वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर: १८७,००० डॉलर ते २५३,००० डॉलर
- सॉफ्टवेअर इंजिनिअर मॅनेजर: १९९,००० डॉलर ते ३१६,००० डॉलर
- स्टाफ सॉफ्टवेअर इंजिनिअर: २२०,००० डॉलर ते ३२३,००० डॉलर
गुगलमध्ये शास्त्रज्ञांना मिळणारा पगार (रेंज: १३३,००० डॉलर ते ३०३,००० डॉलर)
डेटा सायंटिस्ट: १३३,००० डॉलर ते २६०,००० डॉलर
- रिसर्च सायंटिस्ट: १५५,००० डॉलर ते ३०३,००० डॉलर
गुगल मॅनेजर्सना मिळणारा पगार (रेंज: ११६,००० डॉलर ते २७०,००० डॉलर)
- टेक्निकल प्रोग्राम मॅनेजर : ११६,००० डॉलर ते २७०,००० डॉलर
- प्रोग्राम मॅनेजर : १२५,००० डॉलर ते २३६,००० डॉलर
- प्रोडक्ट मॅनेजर: १३६,००० डॉलर ते २८०,००० डॉलर
गुगल कंसल्टंट्सना मिळणारा पगार (रेंज: १००,००० डॉलर ते २८२,००० डॉलर)
- सोल्युशन्स कन्सल्टंट: १००,००० डॉलर ते २८२,००० डॉलर
- टेक्निकल सोल्युशन्स कन्सल्टंट: ११०,००० डॉलर ते २५३,००० डॉलर
गुगल डिझायनर्स (रेंज: १२४,००० डॉलर ते २३०,००० डॉलर)
- यूएक्स डिझायनर: १२४,००० डॉलर ते २३०,००० डॉलर
- यूएक्स रिसर्चर : १२४,००० डॉलर ते २२४,००० डॉलर
गुगलमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचे मुल्यमापण कसे होते?
कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मुल्यमापण गुगल रिव्ह्युज अँज डेव्हलपमेंट या अंतर्गत सिस्टमद्वारे दरवर्षी केले जाते. कर्मचाऱ्यांना इक्विटी आणि बोनस किती दिला जावा हे निश्चित करण्यासाठी कर्मचार्यांची गुणांनुसार वर्गवारी होते. कमी गुण असलेल्यांचे ‘नो इनफ इम्पॅक्ट’ तर सर्वात अधिक गुण असलेल्याचे ‘ट्रान्सफॉर्मेटिव्ह इम्पॅक्ट’ असे वर्गिकरण केले जाते.