How to Download Pan Card Online : आधार कार्ड व पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहेत. डिजिटलायझेशनमुळे अनेक महत्त्वाची सरकारी कागदपत्रे मिळविण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. आता तुम्हाला कागदपत्रांसाठी संबंधित कार्यालयांना भेट देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसून आरामात तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर अनेक कागदपत्रे डाउनलोड करू शकता. पॅन कार्ड ऑनलाइन कसे डाउनलोड करायचे ते जाणून घेऊयात.
e-PAN कार्ड डाउनलोड करण्याचे तीन पर्याय आहेत. तुम्ही या तीनपैकी कोणताही पर्याय वापरून ऑनलाइन पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.
१) NSDL वरून डाउनलोड करा पॅन कार्ड
- नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड म्हणजेच NSDL वरून पॅन कार्ड घर बसल्या डाउनलोड करता येते.
- NSDL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि ‘e-PAN डाउनलोड करा’ या पर्यायावर क्लिक करा.
- पॅन कार्डसाठी अर्ज करताना मिळालेला १५-अंकी अॅक्नॉलेजमेंट नंबर मागितला जाईल, तो भरा.
- कॅप्चा टाइप करून सबमिट करा
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल
- व्हेरिफिकेशन करण्यासाठी पोर्टलमध्ये OTP भरा
- पुढे तुम्हाला पॅन कार्ड PDF डाउनलोड करण्याचा पर्याय दिला जाईल
- ई-पॅन कार्ड PDF साठी पासवर्ड मागितला जातो. त्याचा पासवर्ड तुमची जन्मतारीख असते.
२) इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेड वेबसाइटवरून डाउनलोड करा ई-पॅन कार्ड
युजर्स जर पोर्टलवरून अर्ज करत असतील तर ते UTIITSL वेबसाइटवरून पॅन कार्ड डाउनलोड करू शकतात. ज्यांनी नवीन पॅन कार्डसाठी अर्ज केला आहे किंवा ज्यांना पॅन कार्डमध्ये दुरुस्ती आणि अपडेट करायची आहे, त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे.
- UTIITSL च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा
- ई-पॅन कार्ड डाउनलोड करा वर क्लिक करा.
- पोर्टलमध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर, GSTIN नंबर आणि जन्मतारीख ही माहिती भरा.
- कॅप्चा टाइप करा आणि सबमिट करा वर क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेलवर एक लिंक पाठवली जाईल.
- लिंक उघडा आणि ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा.
३) आयकर विभागाच्या वेबसाइटवरून डाउनलोड करा ई-पॅन
तुम्ही तुमच्या आधार कार्डचा वापर करून आयकर विभागाच्या वेबसाइटवरून ई-पॅन डाउनलोड करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
- इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर जा
- इन्स्टंट ई-पॅन ऑप्शनवर क्लिक करा.
- ई-पॅन कार्डवर क्लिक करा.
- ई-पॅन कार्डचे स्टेटस तपासण्यासाठी/ डाउनलोड करण्यासाठी ‘Next’ वर क्लिक करा.
- स्टेटस तपासण्यासाठी आणि ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एका नवीन पेजवर नेलं जाईल.
- तुमचा १२ अंकी आधार कार्ड नंबर एंटर करा आणि पुढे जा.
- त्यानंतर एक ६ अंकी ओटीपी जनरेट होईल आणि तो तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.
- ओटीपी १५ मिनिटांसाठी वैध असेल.
- नंतर तुम्हाला एका पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्ही तुमच्या ई-पॅन अॅप्लिकेशनचे स्टेटस तपासू शकता. जर तुम्हाला नवीन पॅन कार्ड जारी केले असेल, तर तुम्ही ते तिथून डाउनलोड करू शकता.
अशा रितीने वर दिलेल्या तीन पर्यायांपैकी एक वापरून तुम्ही तुमचे पॅन कार्ड घरी बसून ऑनलाइन डाउनलोड करू शकता.