How To Withdraw PF Amount Online and Offline : तुमचा पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी हा फक्त निवृत्तिनंतर गरजेला पडणारी बचत इतका मर्यादीत नाही. हा पैसा तुम्ही तुमच्या आयुष्यातील इतरही महत्त्वाच्या क्षणांसाठी खर्च करू खर्च करू शकता. तुम्ही नोकरी बदलत असाल, आयुष्यात एखादे अनपेक्षित संकट आले असेल किंवा घर खरेदी, शिक्षणाचा खर्च असं काहीतर मोठं काम मार्गी लावायचे असेल तर तुम्ही यासाठी तुमचा पीएफ वापरू शकता.

आता तुम्ही तुमचा पीएफ काही मिनिटांत ऑनलाइन पद्धतीने काढू शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीची परवानगी घेण्याचीही आवश्यकता पडत नाही, इतकेच नाही तर यासाठी तुम्हाला कागदपत्रे किंवा लांब रांगेत देखील उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन अगदी सोप्या पद्धतीने पीएफ काढू शकता.

पीएफ काढून घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

  • २ महिन्यांची बेरोजगारी किंवा निवृत्तीनंतरच पूर्ण पीएफ काढता येतो.
  • वैद्यकीय एमर्जन्सी, शिक्षण, लग्न किंवा घर खरेदी अशा काही ठराविक गरजांसाठी पीएफमधून काही ठराविक प्रमाणात पैसे काढता येतात.
  • अवघ्या १ महिन्याच्या बेरोजगारीनंतर तुम्ही तुमच्या पीएफच्या ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता.
  • पीएफ काढण्याच्या आधी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल?

ईपीएफओ पोर्टलवर लॉग इन करण्यापूर्वी तुमच्याकडे या गोष्टी तयार असतील याची काळजी घ्या –

  • यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर): तुमचा UAN नंबर सक्रिय केलेला आणि KYC पूर्ण असलेला असावा.
  • आधार कार्ड: आधार कार्ड तुमच्या यूएएनशी लिंक केलेले आणि व्हेरिफाय केलेले असणे आवश्यक आहे.
  • बँक तपशील: तुमचे बँक खाते हे तुमच्या आधारशी जोडलेले असले पाहिजे.
  • मोबाईल नंबर: तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी यावेत यासाठी तो तुमच्या आधारबरोबर लिंक असला पाहिजे.

पीएफची रक्कम ऑनलाईन आणि ऑफलाईन कशी काढवी?

अ) पीएफमधून ऑफलाईन पैसे कसे काढावे?

कंपोझिट क्लेम फॉर्म (आधार) Composite Claim Form (Aadhaar) :

तुमचे आधार आणि बँक खाते हे जर तुमच्या यूएएनशी जोडलेले असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. यात नियोक्त्याच्या कसल्याही स्वाक्षरीची गरज पडत नाही. फक्त हा फॉर्म तुमच्या जवळच्या ईपीएफओ कार्यालयात जमा करा

कंपोझिट क्लेम फॉर्म (नॉन-आधार) Composite Claim Form (Non-Aadhaar) :

तुमचे आधार कार्ड जर यूएएनशी जोडलेले नसेल तर तु्म्ही याचा वापर करू शकता. पण हा फॉर्म दाखल करण्यापूर्वी नियोक्त्याचे प्रमाणीकरण गरजेचे असते.

ब) ऑनलाईन पद्धतीने पीएफ कसा काढावा?

तुम्ही ईपीएफओ पोर्टलच्या मदतीने ऑनलाईन देखील पीएफ काढून घेऊ शकता.

  • यासाठी तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड जोडलेले असेल असा सक्रिय केलेला यूएएन लागेल.
  • याबरोबरच चालू मोबाईल नंबर जो तुमच्या आधारीशी जोडलेला असेल
  • ईपीएफओ पोर्टलवर् व्हेरिफाईड केवायसी (बँक, आधार, पॅन)

हे सर्व असल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तुम्हाला पीएफ क्लेम दाखल करता येईल.

UAN वापरून ऑनलाइन पीएफ कसा काढायचा?

  • तुमचा यूएएन आणि केवायसी जर असेल तर तुम्ही काही क्लिक्समध्ये तुमचा पीएफ काढू शकता.
  • ईपीएफओ सदस्य ई-सेवा पोर्टलवरून पुढीलप्रमाणे पीएफ काढू शकतात.
  • ईपीएफओ पोर्टलवर तुमचा यूएएन, पासवर्ड आणि कॅप्चा वापरून लॉग इन करा.
  • त्यानंतर ‘ऑनलाईन सर्व्हिसेस’ मध्ये जा आणि ‘क्लेम(फॉर्म-३१, १९, १०सी अँड १०डी’.
  • तुमच्या यूएएनशी लिंक असलेल्या बँक डिटेल्स तपासून घ्या.
  • डिक्लेरेशनवर क्लिक करा आणि ‘प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेम’ वर क्लिक करा.
  • ड्रॉपडाऊनमधून, क्लेमचा प्रकार निवडा — फूल पीएफ सेटलमेंट, पीएफ अॅडव्हान्स किंवा पेन्शन विथड्रॉवल.
  • त्यानंतर कारण, रक्कम आणि तुमचा सध्याचा पत्ता टाका.
  • फॉर्म सबमिट करा आणि तुमच्या आधारशी लिंक असलेल्या फोन नंबरवर आलेला ओटीपी टाका.

यानंतर तुमचा क्लेम सबमिट होईल आणि तुम्ही पोर्टलवर ‘ट्रॅक क्लेम स्टेटस’ मध्ये जाऊन कधीही त्याची स्थिती ट्रॅक करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमच्याकडे UAN नसेल तर ऑफलाइन पीएफ कसा काढायचा?

  • तुमच्याकडे UAN नसेल तरी तुम्ही तुमचा EPF अॅक्सेस करू शकता. यासाठी तुम्हाला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • ईपीएफओ वेबसाइटवरून कंपोझिट क्लेम फॉर्म (आधार किंवा नॉन-आधार ) डाउनलोड करा .
  • ते तुमच्या नोकरी, वैयक्तिक आणि बँक यासंबंधीचा तपशीलांसह भरा .
  • तुमचा अल्फान्यूमेरिक पीएफ नंबरवरून (तुमची सॅलरी स्लिप पाहा) तुमचे ईपीएफओ प्रादेशिक कार्यालय शोधा .
  • तुमची ओळख राजपत्रित अधिकारी, दंडाधिकारी किंवा बँक मॅनेजरकडून पडताळून घ्या ( नॉन-आधार फॉर्मसाठी).
  • ईपीएफओ कार्यालयात फॉर्म सबमिट करा . पडताळणी झाल्यानंतर तुमची पीएफ रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

टीप: या प्रक्रियेला जास्त वेळ लागतो आणि त्यासाठी मॅन्युअल व्हेरिफिकेशनची आवश्यकता असते—जर तुम्ही तुमचा UAN सक्रिय करू शकत नसाल तरच या पद्धताने पीएफ काढा.