मुंबई: आयसीआयसीआय प्रु. म्युच्युअल फंडाकडून ‘ॲक्टिव्ह मोमेंटम फंड’ आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अॅक्टिव्ह मोमेंटम फंड’ गुंतवणुकीस खुला केला आहे. याचा प्रारंभिक फंड प्रस्ताव (एनएफओ) २२ जुलैला बंद होईल. बाजारातील सातत्यपूर्ण मूल्य आणि मिळकत, तसेच निर्माण होणाऱ्या उत्पन्नाच्या संधींचा फायदा घेण्यासाठी या फंडाची रचना करण्यात आली आहे. किमान ५,००० रुपयांपासून फंडात गुंतवणूक केली जाऊ शकते, त्यानंतर, १,००० रुपयांच्या पटीत अतिरिक्त गुंतवणूक केली जाऊ शकते.

भारताचा भांडवली बाजार वैविध्यपूर्ण आहे जेथे समभाग आणि उद्योग क्षेत्रे वेगवेगळ्या समयी वेगवेगळ्या कमाईचा प्रवाह प्रदर्शित करतात. या योजनेचा उद्देश या बदलत्या प्रवाहांचा फायदा घेणे आहे, असे या निमित्ताने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी शंकरन नरेन म्हणाले. योजनेत उद्योग क्षेत्रे, बाजार भांडवलामध्ये स्थानांतरणाची लवचिकता आहे आणि पोर्टफोलिओच्या बांधणीमध्ये टॉप-डाऊन आणि बॉटम-अप दृष्टिकोनाचा वापर केला जातो. हा फंड ‘निफ्टी ५०० टीआरआय’ या मानदंड निर्देशांकाच्या तुलनेत कामगिरी करेल आणि फंडाचे निधी व्यवस्थापन मनस्वी शाह आणि शर्मिला डिसिल्वा या करतील.

फ्रँकलिन टेम्पलटनचा ‘मल्टी ॲसेट अलोकेशन फंड’ दाखल

फ्रँकलिन टेम्पलटन-इंडियाने समभाग, रोखे आणि कमोडिटीमध्ये गुंतवणूक असणारा ‘फ्रँकलिन इंडिया मल्टी ॲसेट अलोकेशन फंड’ गुंतवणुकीस खुला केला आहे. अत्यंत वेगाने व्यवस्थापित केला जाणाऱ्या फंडातून दीर्घावधीत भांडवलात वाढ मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) ११ जुलैला खुली होऊन, २५ जुलै २०२५ रोजी बंद होईल. या कालावधीत प्रति युनिट १० रुपये दराने किमान ५,००० रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फंडामध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅप विभागांमधील समभागांमध्ये ‘ग्रोथ’ आणि ‘व्हॅल्यू’ रणनीतीच्या एकत्रिकरणाने गुंतवणूक केली जाईल. शिवाय फंडाला रोखे, मनी मार्केट साधने आणि कमोडिटीजमधील वितरण पूरक ठरेल. नव्या योजनेविषयी बोलताना फ्रँकलिन टेम्पलटन-इंडियाचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर म्हणाले, फंडाचे लवचिक मालमत्ता वाटप धोरण हे समभाग, निश्चित उत्पन्न साधने आणि कमोडिटीजच्या विशिष्ट जोखीम-लाभ समीकरणांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने विकसित केले गेले आहे. सोन्यासारख्या मालमत्ता वर्गांना एकत्रित करणारा पोर्टफोलिओ उत्कृष्ट जोखीम समायोजित परतावा गुंतवणूकदारांना देऊ शकेल. फंडाकडून समभाग निवडीसाठी बॉटम-अप धाटणीचे – क्वालिटी, ग्रोथ, सस्टेनेबिलिटी आणि व्हॅल्युएशन (क्यूजीएसव्ही) – निकषांचा वापर केला जातो. जानकीरमण रेंगा राजू, राजासा के. रोहन मारू, पल्लव रॉय, संदीप मनम (समर्पित परदेशी समभाग निधी व्यवस्थापक) यांच्याकडून योजनेचे निधी व्यवस्थापन पाहिले जाणार आहे.