सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : संरक्षण सामग्री उत्पादनात भारत स्वयंपूर्ण बनवण्याच्या केंद्राच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेत छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीतील नवउद्यमींचाही उत्साहवर्धक सहभाग असून, संरक्षण क्षेत्राला लागणारे ड्रोनसह विविध उपकरण निर्मिती तसेच ७६ प्रकारच्या गरजा व समस्यांवर तांत्रिक उत्तर शोधण्यासाठी येथे विविध उपक्रमांकडून चाचपणी केली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, आतापर्यंत येथील नवउद्यमी उपक्रमांकडून संरक्षण खात्याने सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या उपकरणांची खरेदी देखील केली आहे.

AI shield to protect against cyber criminals
सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी ‘एआय’ची ढाल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Benefits of PPF Investment in 2024
‘पीपीएफ’ गुंतवणूकदारांना मिळणार ७.१ टक्क्यांचा लाभ; पोस्टाच्या योजनांवरील व्याजदर सलग तिसऱ्या तिमाहीत जैसे थे!
Loksatta chip charitra Fables revolution chip Semiconductor chip manufacturing Morris Chang TSMC
चिप चरित्र: ‘फॅबलेस’ क्रांतीची नांदी
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
Important observations in the hearing letter of the National Green Tribunal regarding development works by blocking drains
नाले बंदिस्त करून विकासकामे करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना चपराक; राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या सुनावणी पत्रात महत्वाची निरीक्षणे
onion export duty marathi news
विश्लेषण: कांदा निर्यातीवरील शुल्क कमी होऊनही उत्पादक नाराज का?
MHADA Lottery 20 percent of house price given MHADA housing scheme Maharashtra government
२० टक्क्यांतील घरांच्या वाढीव किमतीवर नियंत्रण! प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत

सध्या येथे कार्यरत विविध दहाहून अधिक उपक्रमांमधून संरक्षण क्षेत्रास लागणाऱ्या विविध प्रकारच्या मोटारी, रणगाड्यांना लागणारे साहित्य तसेच जहाज बांधणीसाठी लागणारी उपकरणे पुरवली जात आहे. संरक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नवउद्यमींनी पुढाकार घ्यावा, असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे. विशेषत: रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रात लागणाऱ्या सुट्या भागाची निर्मिती करण्याचे कौशल्य औद्योगिक वसाहतींमध्ये असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना सांगण्यात आले.

हेही वाचा… मारुती सुझुकीच्या मोटारी महागणार, उत्पादन खर्चात वाढ झाल्याने जानेवारीपासून किंमतवाढ

तूर येथे होणाऱ्या रेल्वे निर्मितीच्या कारखान्यातील सुटे भाग बनविण्यासाठीही चाचपणी सुरू आहे. आता संरक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर मात करण्याारे तंत्रज्ञान प्रयोगाअंती निर्मिती करता यावी यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये चाचपणी केली जात आहे. या नव्या घडामोडींबाबतची माहिती देताना मॅजिक या नवउद्यमी उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या कंपनीचे संचालक आशिष गर्दे म्हणाले, ‘अलीकडेच ‘डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज’चे आयोजन करण्यात आले होते. ‘डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन’ आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांवर काम करणाऱ्या केंद्र सरकारच्या १८ कंपन्यांनी त्यांच्या गरजांची माहिती दिली आहे.

ड्रोन निर्मिती क्लस्टरकडे वाटचाल

या भागातून संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या ‘ड्रोन’ निर्मितीमध्ये अनेक उद्योजक सध्या काम करत आहेत. ड्रोनला लागणाऱ्या लोखंडी चकत्या, बॅटरी, तसेच स्वयंचलित यंत्रासाठी आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान स्थानिक स्तरावरच विकसित आहे. या भागात ‘ड्रोन निर्मितीचे क्लस्टर’ व्हावे अशी मागणी आहेच. त्यास सरकारही सकारात्मक आहे. पण संरक्षण विषयक इतर गरजांवरही उपाययोजना करता येतील का, याची चाचपणी केली जात आहे.

हेही वाचा… विकास दराबाबत ६.४ टक्क्यांचा अंदाज , ‘एस अँड पी’चे ०.४ टक्क्यांच्या अधिक वाढीचे सुधारीत अनुमान

गेल्या काही दिवसांमध्ये मॅजिक संस्थेच्या वतीने ८० नवउद्योजकांना प्रोत्साहन देऊन त्यांना तांत्रिक सहाय्यही करण्यात आले आहे. त्यातील काही नवउद्यमी प्रयोग संरक्षण क्षेत्रासाठीही उपायोगी पडू शकतील, असाही दावा केला जात आहे. संरक्षण क्षेत्रात विविध उपकरणांना सुटे भाग पुरविणारे विवेक हंबर्डे म्हणाले, इलेट्रॉनिक्सचे काही भाग तर पुरविले जातातच. शिवाय विविध यंत्रांना लागणारे सुटे भागही दिले जातात. विद्युत मोटारीही दिल्या जातात. त्यामुळे उच्च दर्जाचे सुटे भाग पुरविण्याची क्षमता या भागात आहेच.