ITR Filing Deadline 2025 : आयटीआर फाइल करण्यासाठी मागील काही दिवासांपासूनच सुरूवात झालेली आहे. मात्र, अजूनही हजारो करदात्यांनी आयटीआर भरलेले नाहीत. त्यामुळे या वर्षी आता आयटीआर भरण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील आतापर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरलेलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख काय?
दरम्यान, या वर्षी आयकर विभागाने आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै दिली होती. मात्र, अद्यापही हजारो करदात्यांनी आयटीआर भरलेले नाहीत. त्यामुळे आता ३१ जुलै २०२५ वरून १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर रिटर्न भरण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयटीआर रिटर्न भरता येणार आहेत.
अंतिम मुदत चुकवल्यास काय परिणाम होतात?
तुम्ही आयटीआर भरण्यासाठी अंतिम मुदत चुकवली तरी देखील तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत विलंब शुल्कासह आणि व्याज भरून उशिरा परतावा दाखल करू शकता. मात्र, त्यासाठी विलंब शुल्क भरावा लागत असल्यामुळे याचा तोटा करदात्यांना सहन करावा लागतो. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
व्याज : जर तुम्ही अंतिम मुदतीनंतर देखील आयटीआर रिटर्न भरलं नाही तर कलम २३४ अ अंतर्गत न भरलेल्या कर रकमेवर दरमहा १ टक्के व्याज द्यावं लागू शकतं.
विलंब शुल्क : कलम २३४ एफ अंतर्गत विलंब शुल्क आकारले जाते. ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर ५,००० रुपये आणि ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास १,००० रुपये विलंब शुल्क आकारले जाऊ शकते.
किती विलंब शुल्क भरावे लागू शकते?
तुम्हाला अंतिम मुदतीनंतर देखील आयटीआर भरायचा असेल तर त्यासाठी कलम २३४ एफ अंतर्गत विलंब शुल्क आकारले जाते. ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर ५,००० रुपये विलंब शुल्क आकारले जाऊ शकते. तसेच ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर १,००० विलंब शुल्क आकारले जाऊ शकते. दरम्यान, आयटीआर फाइल करण्यासाठी वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळा आयटीआर फॉर्म असतो. त्यामुळे आपल्या आयटीआर फाइल करताना प्रत्येकाने आपला उत्पन्न गट पाहून घेणं गरजेचं आहे.