मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजमधून तिचा वित्तीय सेवा क्षेत्रातील उपक्रम ‘रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड’ गुरुवारी विलग करण्यात आला. नंतर कंपनीचे नाव ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’ असे बदलून तिचे समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्यात येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विलग झालेल्या या अंगाचे मूल्य अंदाजे २० अब्ज डॉलर असण्याची शक्यता आहे.

सुमारे २३३ अब्ज डॉलर मूल्य असलेल्या पालक कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखालील जिओ फायनान्शिअल ही तिच्या २० अब्ज डॉलर मूल्यांकनानुसार आघाडीच्या ४० भारतीय कंपन्यांपैकी एक असेल. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची किंमत निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले विशेष व्यवहार सत्र संपल्यानंतर, बाजाराने या नवागत कंपनीच्या समभागाची प्रत्येकी किंमत २६१.८५ रुपये निश्चित केली. तर विशेष सत्राच्या शेवटी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाची निहित किंमत २,५८० निर्धारित करण्यात आली. बुधवारच्या (१९ जुलै) सत्राअखेरीस रिलायन्सच्या समभागाच्या २,८४१.८५ रुपयांच्या बंद भावाच्या आधारावर हे मूल्यांकन ठरवण्यात आले.

Professor Dhirendra Pal Singh, Dhirendra Pal Singh Appointed as Chancellor of tis, Tata Institute of Social Sciences, tis Mumbai, tis new Chancellor, tis news, Mumbai news,
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या कुलपतीपदी धीरेंद्र पाल सिंग
Loksatta explained Why different cultural groups are losing representation in Indian advertising
विश्लेषण: जाहिरातींमधून विविधता का हरवली?
Organizing an international conference on Dr Babasaheb Ambedkar in london
लंडनमध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषद; शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. आंबेडकर
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती

हेही वाचा >>>ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूने पशुधन क्षेत्रासाठी “पतहमी योजने”चा प्रारंभ; पतहमी कवच प्रदान करणार

‘निफ्टी’तील ५१ वा समभाग

रिलायन्स इंडस्ट्रीज ही दोन्ही भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकातील एक वजनदार घटक आहे. हे ध्यानात घेता, गुरुवारी अमलात आलेल्या विलगीकरणामुळे निर्देशांकाच्या रचनेत आणि कामकाजात कोणताही व्यत्यय येणार नाही याची खात्री करण्यासाठी, नवरचित ‘आरएसआयएल’ला निफ्टी निर्देशांकातील ५१ वा समभाग म्हणून सूचिबद्ध केले जाणार आहे. या समभागाचा निर्देशांकातील भारांक (वेटेज) निश्चित करताना, रिलायन्स इंडस्ट्रीज अधिक आरएसआयएल यांचा एकत्रित भारांक आणि किंमत समान राहील, हे म्हणूनच पाहिले गेले आहे. याच कारणाने विलग झालेल्या कंपनीचे समभाग हे एकास एक प्रमाणात रिलायन्सच्या भागधारकांना मिळणार आहेत.

पुढे काय?

आरएसआयएल’चे समभाग कोणाला मिळणार?

ज्या गुंतवणूकदारांकडे २० जुलैला रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग असतील अशा गुंतवणूकदारांना नव्याने स्थापित ‘आरएसआयएल’चे (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस) समभाग मिळतील. म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे दहा समभाग असल्यास नवीन कंपनीचेदेखील दहा समभाग प्राप्त होतील.

हेही वाचा >>>‘महाबँके’ला ८८२ कोटींचा तिमाही नफा; वार्षिक तुलनेत ९५ टक्के वाढ; थकीत कर्जेही कमी

आरएसआयएल’चे समभाग विकता येतील का?

नाही. कंपनी प्रथम पात्र भागधारकांना समभागांचे वाटप करेल. नंतर त्या समभागांच्या सूचिबद्धतेची तारीख घोषित केली जाईल. तोपर्यंत गुंतवणूकदारांना या समभागात खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार नाही. अद्याप कंपनीने ‘आरएसआयएल’च्या समभागांच्या सूचिबद्धतेची तारीख निश्चित केलेली नाही.

GAURAV MUTHE