know where has PM Modi invested his wealth : भारतात गुंतवणुकीचा विचार केला तर बँक फिक्स्ड डिपॉझिट आणि इतर स्मॉल सेव्हिंग्ज योजना या सध्या चांगल्याच लोकप्रिय होताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गुंतवणुकींच्या या पर्यायांवर विश्वास ठेवतात. ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या त्यांच्या जाहीर केलेल्या संपत्तीनुसार, नरेंद्र मोदींनी सर्वाधिक गुंतवणूक बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स (NSC) मध्ये केली आहे. त्यांची एकूण संपत्ती ३४.३ दशलक्ष रुपये आहे, जी एक वर्षापूर्वी ३०.२ दशलक्ष इतकी होती. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी ती २५.१ दशलक्ष रुपये इतकी होती. तर मोदी यांच्याकडे ५९,९२० रुपये इतकी रोकड होती.
सर्वाधिक गुंतवणूक बँक एफडीमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बँक फिक्स्ड डिपॉझिटवर सर्वात जास्त विश्वास टाकतात. गांधीनगरमधील एसबीआय शाखेमध्ये त्यांचे ३,२६,३४,२५८ रुपये इतके पैसे हे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आहेत.
नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स (NSC)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स (NSC) चा मार्ग देखील निवडला आहे, जो की गुंतवणुकीसाठी स्मॉल सेव्हिंग स्कीमचा भाग आहे. त्यांनी या योजनेत ९७४,९६४ रुपये इतकी रक्कम गुंतवली आहे. एनएससी ही एक पोस्ट ऑफीसची योजना आहे, ज्याची मॅच्युरिटी ही ५ वर्षांची आहे. यावर गुंतवणुकीवर वार्षिक ७.७ टक्के व्याज मिळते. ही योजना पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत सुरू करता येते. तसेच या इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत या योजनेतील गुंतवणुकीवर कर सवलत देखील मिळते.
दागिने
मोदी यांच्याकडे ४ सोन्याच्या अंगठ्या आहेत ज्यांचे एकूण वजन ४५ ग्रॅम्स आहे आणि त्यांची किंमत जवळपास ३१०,३६५ रुपये आहे.
बँक बॅलन्स
पंतप्रधान मोदी यांच्या गांधीनगरमधील एसबीआय (SBI) शाखेत १,१०४ रुपये जमा आहेत. त्याच बँकेत त्यांचे ३,२६,३४,२५८ रुरये फिक्स्ड डिपॉझिट आहेत.
म्युच्युअल फंड, बॉण्ड्स, डिबेंचर्स आणि शेअर्स
त्यांनी म्युच्युअल फंड, बॉण्ड्स, डिबेंचर्स किंवा शेअर्समध्ये एक रुपयाचीही गुंतवणूक केलेली नाही.
टीडीएस
या व्यतिरिक्त, पंतप्रधान मोदींच्या पगार, गुंतवणूक आणि उत्पन्नातून टीडीएस म्हणून १,६८,६८८ रुपये कापले गेले आहेत. त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर मिळालेले व्याज २,२०,२१८ रुपये आहे.
मोदींची संपत्ती नेमकी किती वाढली?
२०१४ सालच्या निवडणुकीत मोदी यांनी त्यांची १६.५ दशलक्ष रुपये जाहीर केली होती. २०१९ च्या निवडणुकीत त्यांची संपत्ती २५.१ दशलक्ष रुपयांनी वाढली. तर २०२४ मध्ये त्यांची संपत्ती ३०.१ दशलक्ष डॉलर्सनी वाढली. आता त्यांच्याडे ३४,३६९,५१७ रुपये आहेत. म्हणजेच गेल्या ११ वर्षात त्यांची संपत्ती दुपटीपेक्षा जास्त झाली आहे आणि ही वाढ प्रति वर्ष ४.३ दशलक्ष रुपये इतकी आहे.
उत्पन्नाचे साधन काय आहे?
मोदींनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्पन्नाचा प्रमुख सोर्स हा सरकारकडून मिळणारा पगार आणि त्यांच्या बचतीवर मिळणारे व्याज हेच आहे.
