मुंबई : खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेने सॉलिटेअर सेवेची घोषणा केली आहे. हा बँकिंग प्रोग्राम असून हा ग्राहकांचा केवळ खात्यातील रक्कम, गुंतवणूक, कर्ज, विमा किंवा डिमॅटमधील समभागांची मोजदाद करून सेवा दिली जाणार नसून ग्राहक संबंधावर आधारित आहे.
देशात सधन वर्ग वेगाने वाढत आहे, पण त्यांचा बँकिंग अनुभव अद्यापही चांगला नाही, असे कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष – एफ्लुएंट, एनआरआय व बिझनेस बँकिंगचे प्रमुख आणि मुख्य विपणन अधिकारी रोहित भासिन म्हणाले. सॉलिटेअरच्या माध्यमातून या तफावतीला दूर केले जाणार असून बँकिंग पद्धतींमध्ये नवीन बदल घडवून आणले जातील. ग्राहकांकडून मिळालेल्या अभिप्रायामधून यांची निर्मिती करण्यात आली आहे. ‘सॉलिटेअर’च्या माध्यमातून सहजरित्या गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड उपलब्द करून दिले जातील. पगारदार व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी सेगमेंट-स्पेसिफिक सोल्यूशन्स प्रदान करण्यात येईल.
कोटकचे सॉलिटेअर क्रेडिट कार्ड
सॉलिटेअर ग्राहकांसाठी क्रेडिट कार्डवर कोणतेही वार्षिक शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहकांना अधिक क्रेडिट मर्यादा मिळणार आहे. विमानतळांवर प्राथमिक आणि अॅड-ऑन्ससाठी अमर्यादित लाऊंज उपलब्धता. अतिथी प्रवाशांना देखील लाऊंज उपलब्ध होते. म्हणेजच संपूर्ण कुटुंबाला लाऊंज उपलब्ध होऊ शकते. कोटक अनबॉक्सद्वारे प्रवास खर्चावर १० टक्के एअर माइल्स मिळवता येणार आहे. इतर पात्र खर्चांवर ३ टक्के एअर माइल्स, ज्यात अॅक्सिलरेटेड श्रेणींमध्ये प्रति स्टेटमेंट सायकल १,००,००० एअर माइल्सची मर्यादा आहे. कुटुंबासोबत प्रवासासाठी मोठी बचत यामुळे होणार आहे.
कोटक महिंद्र ही खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. भारतातील अव्वल १०० कुटुंबांपैकी ६० टक्के कुटुंबांचा संपत्ती व्यवस्थापनासाठी या बँकेवर विश्वास आल्याचा बँकेचा दावा आहे. कोटक महिंद्र बँकेचा समभाग बुधवारच्या सत्रात २,१७०.४० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, बँकेचे ४,३१,५६० कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. बँकेच्या समभागाने वर्षात २२.७० टक्के परतावा दिला आहे. मात्र गेल्या तीन महिन्यात गुंतवणूकदारांना २.५४ टक्के उणे परतावा दिला आहे.