लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
पुणे : मर्सिडीज-बेंझने चाकणमधील उत्पादन प्रकल्पात संपूर्णपणे इलेक्ट्रिक ‘मर्सिडीज मेबॅक ईक्यूएस ६८०’ हे एसयूव्ही वाहन सादर केले. सव्वा दोन कोटी रुपये किंमत असलेल्या वाहनाची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ६११ किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.

मेबॅक ईक्यूएस ६८० ही इलेक्ट्रिक एसयूव्ही अवघ्या ४.४ सेकंदांत शून्य ते शंभर किलोमीटरचा वेग गाठते. याची बॅटरी फास्ट चार्जरच्या साहाय्याने फक्त ३१ मिनिटांत ८० टक्के चार्ज होऊ शकते. मर्सिडीज-बेंझने या एसयूव्हीची किंमत रुपये २.२५ कोटी (देशस्तरावर एक्स-शोरूम किंमत) ठेवली आहे. या एसयूव्हीचा सर्वोच्च वेग हा ताशी २१० किमी आहे.

हेही वाचा >>>बजाज हाऊसिंग फायनान्सच्या ‘आयपीओ’ला विक्रमी ३.२५ कोटींच्या बोली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर म्हणाले की, मर्सिडीज मेबॅक ईक्यूएस ६८० सह आम्ही भारतातील ईव्ही प्रकारामध्ये आणखी विस्तार करत आहोत. यामुळे आमच्या ग्राहकांना उत्तम पर्याय मिळतील. तसेच मर्सिडीज-बेंझ भविष्यातील इलेक्ट्रोमोबिलिटीसाठी बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल परिसंस्था तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.