नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील खनिज तेलाच्या मागणीचा २०३० सालापर्यंतचा अंदाज गोल्डमन

सॅक्सने वाढविला आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी कमी होऊन, २०३४ मध्ये खनिज तेलाची मागणी आजच्या तुलनेत दसपटीने वाढून कळस गाठेल आणि तेलशुद्धीकरण प्रकल्पांना दशकाच्या अखेरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त वेगाने उत्पादन सुरू ठेवावे लागेल, असेही जागतिक गुंतवणूकदार संस्थेने म्हटले आहे.

हेही वाचा >>> पर्यावरण-स्नेही अभियांत्रिकी सल्लागार ‘झेड टेक’चा बुधवारपासून ‘आयपीओ’

गोल्डमन सॅक्सच्या संशोधन विभागाने हा भविष्यवेधी अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, खनिज तेलाची मागणी सध्या म्हणजे २०२४ मध्ये प्रतिदिन १.१ कोटी पिंप या उच्चांकी पातळीवर पोहोचेल. तर २०३० साठीचा तेलाच्या मागणीचा अंदाज तिने प्रतिदिन १०.६ कोटी पिंपावरून वाढवून प्रतिदिन १०.८५ कोटी पिंपावर नेला आहे. त्यानंतर देखील ही मागणी वाढती राहणार असल्याने ‘ओपेक प्लस’ संघटनेत सदस्य असणारे तेल निर्यातदार देश आणि सहकारी देश यांच्या उत्पन्नांत त्यामुळे वाढ होईल. याचवेळी जीवाश्म इंधनाच्या उत्सर्जनातील वाढीमुळे तापमान वाढीचा धोका आणखी वाढेल, असेही तिने म्हटले आहे.  

हेही वाचा >>> पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम पाहा फक्त एका मिस्ड कॉलवर; काय आहे नंबर अन् प्रोसेस? घ्या जाणून

खनिज तेलाची मागणी २०३४ मध्ये प्रतिदिन ११ कोटी पिंप या उच्चांकी पातळीवर पोहोचेल. दशकभरात मागणीत गाठला जाणारा हा कळस असेल. त्यानंतर मात्र खनिज तेलाच्या मागणीतील वार्षिक सरासरी वाढीचा दर २०४० पर्यंत ०.३ टक्क्यापर्यंत कमी होईल. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत सध्या वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे पारंपरिक इंधन म्हणून खनिज तेलाची मागणी वाढतीच राहिल. मुख्यत: भारत, चीन आणि आशियातील विकसनशील बाजारपेठांतून २०४० पर्यंत खनिज तेलाला सर्वाधिक मागणी दिसून येईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिन्याच्या सुरुवातीला, ऊर्जा क्षेत्राची आंतरराष्ट्रीय संघटना ‘आयईए’ने जागतिक तेलाच्या मागणीने २०३० पूर्वीच शिखर गाठण्याची अपेक्षा केली होती. तेथून पुढे मागणीत उतार दिसून येण्याचे तिचे कयास आहेत. ‘आयईए’ने चालू वर्षासाठी मागणीचा अंदाज प्रतिदिन एक लाख ४० हजार  पिंपांनी कमी करून ११ लाख पिंपांपर्यंत घटवला आहे.