Income Tax Return: आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी विक्रमी ८ कोटींहून अधिक प्राप्तिकर परतावे दाखल केले गेले आहेत. प्राप्तिकर विभागाने ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर शेअर केली आहे. प्राप्तिकर विभागाने सांगितले की, देशात एकाच वर्षात ८ कोटींहून अधिक प्राप्तिकर रिटर्न भरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

प्राप्तिकर विभागाचे मोठे यश

ही विभागाची मोठी उपलब्धी असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हणणे आहे. आजपर्यंत २०२३-२४ च्या मूल्यांकन वर्षासाठी ८ कोटींहून अधिक प्राप्तिकर रिटर्न भरले गेले आहेत. प्राप्तिकर विभागाने सांगितले की, विभागाने हा टप्पा गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. मूल्यांकन वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण ७,५१,६०,८१७ करदात्यांनी प्राप्तिकर रिटर्न भरले होते. ८ कोटी आयटीआरचा आकडा पार करण्यासाठी आणि हे यश साध्य करण्यात मदत केल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने सर्व करदाते आणि कर व्यावसायिकांचे आभार मानले आहेत.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
The central government has announced the guaranteed price of six rabi crops
हमीभावाचा अर्थ व अनर्थ
New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत
ipo investment
Initial Public Offer: गुंतवणूकदारांचा ‘आयपीओ’द्वारे २०२४ मध्ये विक्रमी १.२२ लाख कोटींचा भरणा

१० कोटींहून अधिक प्राप्तिकर भरला

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत सांगितले की, कर भरणाऱ्यांची संख्या १० कोटींच्या पुढे गेली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण १०.०९ पॅन कार्डधारकांनी प्राप्तिकर भरला आहे. मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी २ डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण ७.७६ कोटी करदात्यांनी प्राप्तिकर रिटर्न भरले होते, जे आता ८ कोटी पार झाले आहेत. मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने सांगितले की, २०१८-१९ च्या मूल्यांकन वर्षात देशातील करदात्यांची संख्या ८,४५,२१,४८७ होती, जी २०१९-२० मध्ये ८,९८,२७,४२० पर्यंत वाढली आणि कमी झाली. मूल्यांकन वर्ष २०२०-२१ मध्ये कमी होऊ ८,२२,८३,४०७ जे मूल्यांकन वर्ष २०२१-२२ मध्ये ८,७०,११,९२६ आणि मूल्यांकन वर्ष २०२२-२३ मध्ये ९,३७,७६,८६९ पर्यंत वाढले आहे. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात १०.०९ कोटी करदात्यांनी सरकारकडे कर भरला आहे.