मुंबई : परकीय भांडवलाचा अखंड ओघ आणि बँकिंग व ग्राहकपयोगी वस्तू कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या तुफान खरेदीने प्रमुख निर्देशांकांनी पुन्हा सलग सहाव्या सत्रात नवीन विक्रमी पातळी गुरुवारी गाठली. परिणामी निफ्टी निर्देशांक २० हजार अंशांनजीक पोहोचला, तर सेन्सेक्सने देखील ६७,६१९.१७ या नवीन विक्रमाला गवसणी घातली.दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ४७४.४६ अंशांची कमाई करत ६७,५७१.९० या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाला. सत्रात त्याने ५२१.७३ अंशांची मजल मारत ६७,६१९.१७ अंशांची सर्वोच्च पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४६ अंशांची वाढ झाली आणि तो १९,९७९.१५ या विक्रमी उच्चांकावर स्थिरावला. दरम्यान निफ्टीने दिवसभरातील सत्रात १९,९९१.८५ या सर्वोच्च शिखराला स्पर्श केला.

निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसीच्या समभागातील तेजीने निर्देशांकांना नव्या उंचीवर पोहोचवले. विद्यमान आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत बँकांकडून चांगल्या आर्थिक कामगिरीची अपेक्षा असून, बँकिंग क्षेत्र निर्देशांकांना उच्चांकी पातळीवर नेण्यासाठी अतिरिक्त चालना देत आहेत. जागतिक पातळीवरील संमिश्र संकेतांना दुर्लक्षून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या समभाग खरेदीच्या सपाट्यामुळे देशांतर्गत बाजारात तेजीची दौड कायम आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

On the strength of PSU banks the Sensex reached the level of 486 points
पीएसयू बँकांच्या जोरावर सेन्सेक्सची ४८६ अंशांची मुसंडी
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर

हेही वाचा >>>ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूने पशुधन क्षेत्रासाठी “पतहमी योजने”चा प्रारंभ; पतहमी कवच प्रदान करणार

सेन्सेक्समध्ये आयटीसीचा समभाग ३ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ कोटक महिंद्र बँक, आयसीआयसीआय बँक, मारुती, भारती एअरटेल, स्टेट बँक, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग सर्वाधिक तेजी दर्शवित होते. तर दुसरीकडे, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फिनसर्व्ह, लार्सन अँड टुब्रो, टायटन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि विप्रोच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १,१६५.४७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

हेही वाचा >>>‘महाबँके’ला ८८२ कोटींचा तिमाही नफा; वार्षिक तुलनेत ९५ टक्के वाढ; थकीत कर्जेही कमी

बाजार आकडेवारी

सेन्सेक्स ६७,५७१.९० ४७४.४६ ( ०.७१)
निफ्टी १९,९७९.१५ १४६ ( ०.७४)
डॉलर ८१.९६ -१२
तेल ७९.५६ ०.१३

GAURAV MUTHE