मुंबई : माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील मध्यम-श्रेणीतील कंपनी पर्सिस्टंट सिस्टीम्सने यंदा नवीन नोकरभरतीत आणि त्यासाठी शिक्षणसंस्थाच्या ‘कॅम्पस’ला भेट देण्यावर भर तुलनेने कमी राहिल, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी स्पष्ट केले.पुण्यात मुख्यालय असलेल्या या कंपनीने डिसेंबर तिमाहीची मिळकत कामगिरी जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी, तिचे मुख्य वित्तीय अधिकारी सुनील सप्रे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत वरील माहिती दिली. सप्रे म्हणाले की, जवळपास १८ महिन्यांपासून प्रशिक्षण सुरू आहे आणि अद्याप विशिष्ट प्रकल्पांवर नियुक्त केले गेलेले नाहीत अशा नव्याने भरती झालेल्या उमेदवारांचे प्रमाण आधीच खूप जास्त आहे. परिणामी नवीन नोकरभरतीबाबत हळूवारपणे पावले टाकली जात आहेत. पुढील तीन वर्षांमध्ये, कंपनीने तिच्या परिचालन नफ्याचे मार्जिन सध्याच्या १४.५ – १५ टक्क्यांच्या पातळीच्या तुलनेत जवळपास ३ टक्के अधिक राखण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे सप्रे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> अंबानी कुटुंबाने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेप्रसंगी घेतला सहभाग, मंदिरासाठी ‘एवढ्या’ कोटींची दिली देणगी

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

यंदा तुलनेने कमी कॅम्पसला भेटी दिल्या जातील काय, असे विचारले असता सप्रे यांनी त्याला होकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले की, कंपनीच्या मनुष्यबळाची एकूण संख्या २३,३३६ पर्यंत नेण्यासाठी सुमारे ५०० लोक नव्याने सामावले गेले आहेत. सर्व नियुक्त मनुष्यबळाचा ८३ टक्क्यांपेक्षा जास्त वापर करण्याचे उद्दिष्ट ठेऊन कंपनीकडून सध्या नियोजन केले जात आहे. असे झाले तरच कंपनीला आवश्यक ती नफाक्षमता पातळी गाठण्यास मदत मिळू शकेल. डिसेंबर तिमाहीसाठी, मनुष्यबळ वापर ८१.५ टक्के पातळीवर गेला आहे आणि तो आणखी उंचावेल अशा योजना सुरू आहेत, असे ते म्हणाले. सध्या या क्षेत्रात कमी संधी उपलब्ध असल्याने मनुष्यबळ गळती (नोकऱ्या बदलणारे, सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण) ११.५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, ही बाब देखील मदतकारक ठरली आहे, असे त्यांनी नमूद केले.