मुंबई: हर्शेज इंडियाकडून जम्पइन ही नाममुद्रा विकत घेतल्याची घोषणा ‘रसना’ने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. या निमित्ताने कंपनीने आता तयार पेय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या भारतीय शीतपेय बाजारपेठेत रसनाने दोन वर्षांत १,००० कोटी रुपयांचे महसुली उद्दिष्ट ठेवले आहे.

जम्पइनमधील १०० टक्के हिस्सा रसनाने विकत घेतला असला तरी या व्यवहाराची रक्कम कंपनीने जाहीर केलेली नाही. हा व्यवहार ३५० कोटी रुपये मोबदल्यात झाला असण्याची शक्यता मात्र बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. गोदरेज समूहाने जम्पइन ही पेय नाममुद्रा सुरूवातीला सादर केली होता. नंतर त्याचे व्यवस्थापन हर्शेज इंडियाकडे गेले. करोना साथीच्या संकटकाळात जम्पइनचे उत्पादन बंद पडले. त्याआधी त्याचा वार्षिक महसूल १५० कोटी रुपये होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत रसनाचे अध्यक्ष पिरूझ खंबाटा म्हणाले की, आम्ही हर्शेजकडून जम्पइन हा ब्रँड विकत घेतला असून, त्यांच्या निर्मिती सुविधांचा त्यात समावेश नाही. आम्ही आमच्या निर्मिती सुविधांमधून त्याचे उत्पादन सुरू करू. जम्पइनला मोठा वारसा असून, एक कौटुंबिक नाममुद्रा म्हणून त्याकडे पाहिले जाते. देशात पहिल्यांदा ट्रेटा पॅकचा वापर सुरू करणारे जम्पइन आता रसनाकडूनहा नव्या रुपात पीईटी बाटलीतून आणि ट्रेटापॅकमधून केले जाईल. जम्पइन पेय हे १२५ मिलीच्या पॅकपासून आणि १० रूपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.